गटशिक्षणाधिकाऱ्याने तोडले अकलेचे तारे! 6 वर्षांपूर्वी निधन झालेल्या कर्मचाऱ्याला लावली ड्यूटी

Duty Order Issued To Dead Employee In Maharashtra: बीडमध्ये गटशिक्षणाधिकारी समंदर खान यांनी 6 वर्षांपूर्वी निधन झालेल्या ग्रामसेवक अरविंद आगलावे यांच्या नावाने दहावी परीक्षेच्या पथकासाठी आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे.
Official order issued in the name of deceased Gram Sevak Arvind Agalave sparks controversy in Beed education department.
Official order issued in the name of deceased Gram Sevak Arvind Agalave sparks controversy in Beed education department.Saam Tv
Published On

योगेश काशीद, साम टीव्ही

बीडचे गटशिक्षणाधिकारी समंदर खान हे या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. या महाशयांनी दहावीच्या भरारी पथक आणि बैठे पथक नियुक्त करताना चक्क चार-पाच वर्षांपूर्वी मृत झालेल्या ग्रामसेवकाच्या नावाने ऑर्डर काढून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. आता या कर्मचाऱ्याला ऑर्डर इशू करण्यासाठी समंदर खान हे स्वतः स्वर्गात जाणार की हाताखालच्या एखाद्या कर्मचाऱ्याला स्वर्गात पाठवून ऑर्डर इशू करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या नावाने ऑर्डर काढून आपला गलथानपणा दाखवून देणाऱ्या गटशिक्षणाधिकारी खान यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Official order issued in the name of deceased Gram Sevak Arvind Agalave sparks controversy in Beed education department.
Accident News : लग्नानंतर अघटित घडलं, ३५ जणांचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या ट्रकला भीषण अपघात

बीड जिल्ह्यात आणि राज्यात शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली. या परीक्षेमध्ये कॉपी सारखे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून प्रशासनाच्या वतीने कडक पावले उचलून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेच्यावेळी चौसाळा येथील एका महाविद्यालयात सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या महाविद्यालयावर नेमणुकीस असलेल्या 16 शिक्षकांवर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Official order issued in the name of deceased Gram Sevak Arvind Agalave sparks controversy in Beed education department.
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; तब्बल 46 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

यामध्ये 2021 साली आजारपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या ग्रामसेवक अरविंद आगलावे यांचे देखील नाव आल्याने आणि त्यांच्या नावाने ऑर्डर इशू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एटी आगलावे यांच्यावर बैठे पथकाची जबाबदारी दिली गेली असून जेवढ्या कर्मचाऱ्यांच्या नावाने हे आदेश पारित झाले आहेत त्यात 05 वर्षांपूर्वी निधन झालेल्या ग्रामसेवक आगलावे यांचे नाव आल्याने गटशिक्षणाधिकारी यांनी कशा प्रकारे या ऑर्डर काढल्या यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com