Beed News
Beed NewsSaam tv

10 लाख रुपयांच्या चॉकलेट चोरल्‍या; गोडाऊनची डुप्लिकेट चावी बनवून नोकराने मारला डल्ला

10 लाख रुपयांच्या चॉकलेट चोरल्‍या; गोडाऊनची डुप्लिकेट चावी बनवून नोकराने मारला डल्ला
Published on

बीड : गोडाऊनची डुप्लिकेट चावी तयार करून तब्बल 10 लाख रुपयांच्या चॉकलेटवर दोन नोकरांनी डल्ला मारला. हा प्रकार (Beed) बीडच्या अंबाजोगाई शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एजन्सी चालकाच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस (Police) ठाण्यात 2 नौकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Beed News
Nandurbar: सातपुड्याच्या दुर्गम भागात काँग्रेसची पदयात्रा; भारत जोडो यात्रेची जनजागृती

अंबाजोगाई (Ambajogai) येथील व्यावसायिक प्रदीप उमाकांत वाघमारे यांच्याकडे चॉकलेटची डिस्ट्रीब्यूटरशिप आहे. या ठिकाणी गणेश सखाराम मुनीमाने आणि राहुल वैजीनाथ पवार हे दोन नोकर मागील पाच वर्षापासून कामाला आहेत. कॅमेऱ्याचे (CCTV) फुटेज तपासले असता त्यात गणेश मुनीमाने आणि राहुल पवार हे दोघे चॉकलेटचे बॉक्स चोरी करताना मिळुन आले.

दोघांना रंगेहाथ पकडले

सीसीटीव्‍हीमध्‍ये सदरचा प्रकार दिसल्‍यानंतर वाघमारे यांनी पाळत ठेऊन 11.30 वाजताच्या सुमारास दोन्ही नोकरांना चॉकलेटचे बॉक्स चोरताना रंगेहाथ पकडले. दरम्यान एजन्सी मालकाच्या तक्रारीवरून 2 नोकरांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com