Beed News : बीड हादरलं! पाण्यासाठी भावकी जीवावर उठली; बापलेकाला अमानुष मारहाण

Beed Crime News : बीडच्या गेवराई तालुक्यात विहिरीच्या पाण्यावरून बापलेकावर अमानुष हल्ला. दोघे गंभीर जखमी आहेत. हल्लेखोर भावकीतले असून पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप.
Beed News : बीड हादरलं! पाण्यासाठी भावकी जीवावर उठली; बापलेकाला अमानुष मारहाण
Beed Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • बीडच्या गेवराई तालुक्यात पाण्याच्या वादातून बापलेकावर हल्ला

  • दोघांनाही गंभीर दुखापत, एक जण बेशुद्ध

  • तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

  • पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचा पीडितांचा दावा

बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विहिरीच्या पाण्याच्या वादातून बापलेकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोरांनी पीडितांच्या कुटुंबियांना आमच्या विरोधात तक्रार दाखल केली तर अंगावर गाडी घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धक्कादायक म्हणजे पीडितांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली असता गेवराई पोलिसांकडून तक्रार घेण्यास नकार दर्शवण्यात आला आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील आसाराम चव्हाण आणि बद्रीनारायण चव्हाण यांना विहिरीतील पाणी का घेतले असे विचारत अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली. बद्रीनारायण चव्हाण हे बेशुद्ध अवस्थेत आहेत, तर आसाराम चव्हाण यांना देखील जबर मार लागल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Beed News : बीड हादरलं! पाण्यासाठी भावकी जीवावर उठली; बापलेकाला अमानुष मारहाण
HSC Exam 2025-26 News : विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट! आजपासून बारावीची परीक्षा, १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार परीक्षेला

त्यांनी सांगितले की, पाच ते सहा लोकांनी त्यांना अमानुष मारहाण केली. मात्र गेवराई पोलिसांनी त्यांची याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली नाही. शिवाय ते म्हणाले की, भावकी मधीलच सहा जणांकडून आम्हाला मारहाण झाली आहे. आम्हाला न्याय पाहिजे असून पोलिसांनी आम्हाला तक्रार घेण्याऐवजी पोलीस स्टेशन मधून चालते व्हा असे म्हणत हाकलून लावले असे ते म्हणाले.

Beed News : बीड हादरलं! पाण्यासाठी भावकी जीवावर उठली; बापलेकाला अमानुष मारहाण
Shocking : अर्धनग्न असताना रूमचा दरवाजा उघडला, प्रसिद्ध हॉटेलमध्ये स्पा थेरपी सुरू असताना परदेशी महिलेसोबत भयंकर घडलं

आसाराम चव्हाण यांना त्यांच्या भावकीतील सुजल चव्हाण, सतीश चव्हाण, रामदास चव्हाण, सुरज चव्हाण, युवराज चव्हाण,गंगाधर चव्हाण संबंधित व्यक्तींकडून धमकी दिली जात आहे. तक्रार दाखल केली तर अंगावर गाडी घालून जीवे मारू अशी या हल्लेखोरांनी धमकी दिली असल्याचं आसाराम चव्हाण यांनी म्हटलं. दरम्यान चव्हाण बापलेकाला न्याय मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com