Beed Crime News: ५ वर्षीय चिमुकलीवर ५२ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार; बीडमधील संतापजनक घटना

Crime News: चिमुकली त्याच्या नातवासोबत बाहेर खेळत होती, त्याने तिला घरात बोलवलं अन्...
Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv
Published On: 

Beed News: महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. बीडमधून क्रूरतेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 5 वर्षाच्या चिमूकलीवर 52 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केलाय. ही संतापजनक घटना बीडच्या केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. तर पीडित चिमुकलीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावामध्ये मजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे. पीडित चिमुकली शेजारी राहणाऱ्या नराधम आरोपी अण्णा उर्फ अरुण याच्या नातवंडा सोबत खेळत होती.

Beed Crime News
Mumbai Crime News: बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण? आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

खेळत असताना अरुणने या चिमुकलीस घरात बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून नराधमा आरोपीविरोधात कलम 376 अब, 4 (2) बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 2012 कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनं केज तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. लहान मुलं लैंगिक अत्याचाराचे बळी ठरण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर देखील अत्याचाराच्या घटना घडतायत. या सर्वांमध्ये आपल्या मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श याची महिती असणे गरजेचे आहे. अनेक पालक आता आपल्या पाल्यांना विशेषता मुलींना चांगल्या आणि वाईट स्पर्शाची माहिती देतात.

Beed Crime News
Pune Crime News: दुर्लक्ष का करतेस? प्रेमाचा स्वीकार कर...; PMPML बस कंडक्टर महिलेचा विनयभंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.