Pune Crime News: दुर्लक्ष का करतेस? प्रेमाचा स्वीकार कर...; PMPML बस कंडक्टर महिलेचा विनयभंग

PMPML Crime News: आरोपीला महिला आवडत असल्याने गेल्या २ महिन्यांपासून तो तिचा पाठलाग करत होता.
nagar , Crime News
nagar , Crime NewsSaam TV
Published On

Pune Crime: पुण्यातील महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशात पीएमपीएमएलमधील बस कंडक्टर महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. पीएमपीएमएलमध्येच काम करणाऱ्या सहकाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडिता आणि आरोपी दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. आरोपीला महिला आवडत असल्याने गेल्या २ महिन्यांपासून तो तिचा पाठलाग करत होता. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, सुनील (वय ४३) या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

nagar , Crime News
Palghar Crime News: पालघरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षावर ॲट्रॉसिटी गुन्हा; आदिवासी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार जून महिन्यापासून सुरू होता. भालेकर हा पीडितेच्या कामाच्या ठिकाणी ओळख झालेला सहकारी असून त्याने मागील २ महिन्यांपासून महिलेचा पाठलाग केला. तसेच अनेक वेळा "तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस, माझ्या प्रेमाचा स्वीकार कर" असं म्हणत विनयभंग करत केला. असे वारंवार घडत असल्यामुळे अखेर महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

जम्मू काश्मीरमधील अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण जग हादरलं आहे. अशात महाराष्ट्रात देखील सातत्याने महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या सर्व घटनांना चाप बसवण्यासाठी पोलीस देखील सतर्कतेने काम करत आहेत. मात्र तरीही अद्याप महिला पूर्णत: सुरक्षीत दिसत नाहीत.

nagar , Crime News
Bride News : एकीच्या लग्नाची विचित्र गोष्ट! २७ तरूणांशी केलं लग्न, माहेरी जाते म्हणून सांगायची अन्...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com