Beed Crime : गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार, अंबाजोगाईतील 'त्या' तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; बीड हादरलं

Ambajogai Youth Murder : पोखरी रोडवरील सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी राजकुमार करडेवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करण्यात आले.
Ambajogai Rajkumar Karde young man died during treatment
Ambajogai Rajkumar Karde young man died during treatmentSaam TV News
Published On

बीड : बीड जिल्ह्यात गुन्ह्यांच्या घटना सातत्याने वाढतच असून आताही एका तरुणाने जीव गमावला आहे. अंबाजोगाईतील पोखरी रोडवर एका तरुणावर दोघा जणांनी कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजकुमार करडे असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेने अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोखरी रोडवरील सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी राजकुमार करडेवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

Ambajogai Rajkumar Karde young man died during treatment
Beed Crime : बीडमध्ये पुन्हा खळबळ! गळ्यावर, पाठीवर कोयत्याने वार, तरुणावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला

दरम्यान, हा हल्ला कोणी केला आणि त्यामागचं कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिकचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्हा हादरुन गेला होता. त्यानंतर बीडमधून दररोज नवनवीन घटना समोर येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज अंबाजोगाईमध्ये एका तरुणावर कोयत्याने वार झाल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Ambajogai Rajkumar Karde young man died during treatment
Kalyan News: 'एप्रिल फूल'वरून राजकारण रंगलं; शिंदे गट आणि मनसेत सोशल मीडियावर 'पोस्ट वॉर', कोण काय म्हणालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com