Beed Accident News: एसटी बसची भाविकांच्या पिकपला धडक, दोघांचा जागीच मृत्यूl; सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

Accident News: बीडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात दोन प्राध्यापक आणि दोन महिलांचा समावेश आहे.
Beed Accident News
Beed Accident Newssaam tv
Published On: 

Beed News: बीडमध्ये आज दोन भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसने भाविकांच्या पिकअपला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने 2 प्राध्यापक जागीच ठार झाले आहेत.

बीड-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मध्यरात्री भाविकांच्या पिकपला एसटी बसने धडक दिली आहे. या अपघातामध्ये 2 महिला भाविक जागीच ठार झाल्या, तर 13 जण जखमी आहेत. मथुराबाई गवाले आणि गंगुबाई जाधव ( दोघीही रा. परभणी) अशी मृत भाविकांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास हजारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Beed Accident News
Drone flying Over PM Residence: पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावरून ड्रोन उडवल्याने खळबळ, सुरक्षा यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये

दुसऱ्या घटनेत आज सकाळी बीडहून शिरूर कासार येथील कालिका विद्यालयाला जात असताना झालेल्या भीषण अपघातात, दोन प्राध्यपकांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवर चाललेल्या दोन प्राध्यापकांना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाले. ही घटना बीड-अहमदनगर महामार्गावरील सैनिकी विद्यालयासमोर घडली. (Breaking News)

अंकुश साहेबराव गव्हाणे (वय 35 रा. बीड) आणि शहादेव डोंगर (रा. जाटनांदूर) अशी मयत प्राध्यापकांची नावं आहेत. ते बीडच्या शिरूर कासार शहरात असणाऱ्या कालिका देवी विद्यालय प्राध्यापक होते. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर प्राध्यापकाच्या दुचाकीने पेट घेतला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. (Latest Political News)

Beed Accident News
Maharashtra Politics: राष्ट्रवादीत संघर्ष! अजित पवारांच्या बंडानंतर कार्यकर्त्यांचा थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावरच दावा

बीड अहमदनगर रस्त्यावर सुरू असणाऱ्या कामामुळेच हा अपघात झाला असून सदरील गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.