

राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. बाप्पा घरी आल्याने सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आलीये. या विद्युत रोषणाईत आनंद व्यक्त करतानाच एका लहान मुलावर काळाने घाला घातला आहे. विजेचा झटका लागून मुलाचा मृत्यू झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बीडमधील आष्टी शहरातील जय भोले गणेश मंडळात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मंडळातील गणपतीसाठी संपूर्ण मंडपात डेकोरेशन करण्यात आले होते. यात वापरण्यात आलेल्या विद्युत डेकोरेशन माळेचा मुलाला शॉक लागला. काल रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली आहे.
शिवतेज सोंडगे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी महादेव सोंडगे यांच्या फिर्यादीवरून मंडप मालकाविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेने आष्टी शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आष्टी शहरातील संभाजीनगर येथे जय भोले गणेश मंडळासमोर लोखंडी तार लावून त्यावर लाइटच्या माळा लावल्या आहेत. त्यामुळे शॉक लागल्याचं म्हटलं जातंय. गणेशोत्सवामुळे नागरिक फार उत्साहात आहेत. मात्र उत्साहात आपली स्वस:ची काळजी घेत आनंद व्यक्त करावा. दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात देखील अशीच एक घटना घडली.
मिरवणूकीत झेंडा फडकवताना एका तरुणाचा मृत्यू झालाय. या तरुणाने स्टीलचा रॉड असलेला झेंडा डिजेवर चढून फडकवला. यावेळी झेंडा फडकवताना त्याला विजेचा झटका बसला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.