Bazar Samiti Election : अखेर बाजार समित्यांच्या निवडणुका ढकलल्या पुढं; जाणून घ्या कारण

आज देखील काही हरकती दाखल होणार का याकडे लक्ष लागून आहे.
Bazar Samiti Election, Nandurbar
Bazar Samiti Election, Nandurbarsaam tv
Published On

- सागर निकवाडे

Bazar Samiti Election : नंदूरबार जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या निवडणुका पंधरा मार्च 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या (grampanchayat) निवडणुकीत बाजार समितीची निवडणुकीचा धूराळ उडणार नाही हे निश्चित झाले आहे.

नंदूरबार जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची (election) रणधुमाळी सुरू आहे. यासाठी निवडणुकीकरीता जाहीर कार्यक्रमानुसार नव्याने निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मतदान करण्यापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरु हाेते. (Maharashtra News)

Bazar Samiti Election, Nandurbar
Success Story : नाेकरी मिळाली नाही...जिद्दीने दूसरा मार्ग शाेधला... युवक महिन्याला पन्नास हजार रुपये कमाविताे

दरम्यान न्यायालयाने (court) दिलेल्या आदेशनानूसार आता निवडणुका मार्च 2023 मध्ये हाेणार आहेत. दरम्यान बाजार समितीच्या प्रक्रिया पूर्ण देखील करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील काही बाजार समितीच्या हरकती दाखल करण्याच्या सांगण्यात आलं होतं.

Bazar Samiti Election, Nandurbar
Vasai News : सुमद्रकिनारी सापडलेल्या हजाराे रुपयांचे नागरिकांनी काय केलं ?

त्यानुसार काही हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत. तर आजच्या शेवटच्या दिवस आहे. त्यामुळे आज देखील काही हरकती दाखल होणार का याकडे लक्ष लागून आहे.

Edited By : Siddharth Latkar

Bazar Samiti Election, Nandurbar
BJP News: सरपंच निवडीत दगा दिल्यास, गावच्या विकासाला निधी देणार नाही; भाजप आमदाराचा ग्रामस्थांना सज्जड दम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com