Bank Employee Hangs Himself Inside Office
Bank Employee Hangs Himself Inside OfficeSaam Tv News

Baramati: कामाचा ताण असह्य; मॅनेजरची बँकेतच आत्महत्या, चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड

Bank Employee Hangs Himself Inside Office: बारामतीत बँकेचे मॅनेजर शिवशंकर मित्रा यांनी कामाच्या ताणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून डोळ्यांचं दानही नमूद केलं होतं.
Published on

अतिरिक्त कामाच्या दबावाला कंटाळून मॅनेजरनं बँकेतच गळफास घेत आत्महत्या केलीये. ही धक्कादायक घटना बारामती शहरातील भिगवण परिसरात घडली असून, मृत कर्मचारी बँक ऑफ बडोदामध्ये मुख्य प्रबंधक या पदावर कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. यात त्यांनी कामाचा तणाव असह्य झाल्याचं नमुद केलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवशंकर मित्रा असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, ते बारामती शहरातील भिगवण परिसरातील रहिवासी होते. बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कामाचा दबाव वाढला होता. कामाचा तणाव त्यांना असह्य झाला. बँकेच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

Bank Employee Hangs Himself Inside Office
Akola: धक्कादायक! महिला अधिकाऱ्याचा वकिलाकडून विनयभंग; अश्लील मेसेज अन् कार्यलयात घुसून त्रास, नेमकं काय घडलं?

गुरूवारी मध्यरात्री शिवशंकर यांनी बँकेतच गळफास लावून आयुष्य संपवलं. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात त्यांनी कामाच्या अतिरिक्त दबावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नमुद केलं. तसेच, यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Bank Employee Hangs Himself Inside Office
CM Devendra Fadnavis: 'राज्यात १००% त्रिभाषा सूत्र लागू करणारच' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णयावर ठाम

या चिठ्ठीत त्यांनी पत्नीची माफी मागितली आहे. मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली होती. बँकेच्या कामाचा ताण त्यांना असह्य झाला होता. शेवटी याच त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूनंतर आपले डोळे दान करावेत असेही त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Bank Employee Hangs Himself Inside Office
भिक्षूंसोबत शारीरिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ, जाळ्यात ओढून 'मिस गोल्फ'नं १०० कोटी लुबाडले | Shocking

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com