भिक्षूंसोबत शारीरिक संबंध अन् अश्लील व्हिडिओ, जाळ्यात ओढून 'मिस गोल्फ'नं १०० कोटी लुबाडले | Shocking

Buddhist Monks Scandal: मिस गोल्फ या महिलेने नऊ बौद्ध भिक्षूंना ब्लॅकमेल करत सुमारे ९९ कोटी रुपये उकळले. तिच्याकडून ८०,००० हून अधिक अश्लील व्हिडिओ आणि फोटो सापडले आहेत.
Thai Woman Arrested for Blackmailing Nine Buddhist  Monks
Thai Woman Arrested for Blackmailing Nine Buddhist MonksSaam tv news
Published On

थायलंडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका महिलेला बौद्ध भिक्षूंशी शारीरिक संबंध ठेवून त्यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महिला आरोपी आधी बौद्ध भिक्षूंकांना फसवायची, तसेच त्यांच्याकडून पैसे लुबाडायची. आतापर्यंत या महिलेनं ९ बौद्ध भिक्षूंना फसवून तब्बल ९९ कोटी उकळले आहेत. सध्या पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

अटक झालेल्या महिलेचं नाव मिस गोल्फ असं आहे. महिलेनं केलेल्या आरोपाबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकला. त्यांना तिच्या घरात ८०,००० पेक्षा अधिक अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले. या माध्यमांचा वापर करून तिने भिक्षूंना धमकावून पैसे उकळले. यामुळे थायलंडमधील बौद्ध धर्मसंस्थांवरील लोकांचा विश्वास डळमळीत झाला. यापूर्वीही काही भिक्षूंवर सेक्स रॅकेट आणि ड्रग्ज तस्करीचे आरोप झाले होते.

Thai Woman Arrested for Blackmailing Nine Buddhist  Monks
Mhada Homes: नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, फक्त १४ लाखांत घर; म्हाडाकडून घरांची बंपर लॉटरी

मे २०२४ साली महिलेनं एका भिक्षूसोबत संबंध ठेवले होते. त्यानंतर तिने गर्भवती असल्याची बतावणी करत सुमारे १.६ कोटींची मागणी केली. ही रक्कम मुलाच्या संगोपनासाठी असल्याचं तिनं सांगितलं. ब्लॅकमेलिंगमधून मिळालेले पैसे महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांतून काढून घेतले. दरम्यान, या रकमेचा काही भाग ऑनलाइन जुगारावर खर्च केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

स्कॅण्डलचे रहस्य कसे उलगडले?

गेल्या महिन्यांत बँकॉकमधील एका भिक्षूनं अचानक भिक्षूचे जीवन सोडण्याचा निर्णय घेतला होता. ही बातमी थायलंडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनाही याची माहिती मिळाली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तळाशी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना महिलेकडून ब्लॅकमेल केले जात असल्याची माहिती मिळाली.

Thai Woman Arrested for Blackmailing Nine Buddhist  Monks
Politics: कोल्हापुरात राजकीय भूकंप! काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतलं

समिती स्थापन

या प्रकरणानंतर थायलंडमधील बौद्ध धर्म प्रशासकीय संस्थाने विशेष चौकशी समिती स्थापन केली. या समितीमार्फत आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, पोलिसांकडून तपास सुरू असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com