बारामती-राहुरीत आचारसंहिता लागली, देशात या ८ ठिकाणी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं, पाहा वेळापत्रक

Baramati and Rahuri by election voting date 2026 : निवडणूक आयोगाने सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली असून मतदान एप्रिलमध्ये होणार आहे.
Baramati Rahuri by poll
Baramati Rahuri by pollSaam tv
Published On

Election Commission by election schedule for eight assembly seats India : पश्चिम बंगालसह ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीसोबत निवडणूक आयोगाकडून ८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. ४ मे रोजी सर्व आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. देशातील ८ जागांवर पोटनिवडणुका नेमक्या कुठे कुठे होणार आहेत, वेळापत्रक काय आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात... Baramati and Rahuri by election voting date 2026

पोटनिवडणुकीचं वेळापत्रक -

गोवा, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांतील विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया १६ मार्चपासून सुरूवात होणार आहे. सोमवारी निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना जारी केली जईल. उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी २३ मार्च २०२६ (सोमवार) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अर्जांची छाननी २४ मार्च २०२६ (मंगळवार) रोजी केली जाईल आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ मार्च २०२६ (गुरुवार) असेल. या चार राज्यांमध्ये मतदान ९ एप्रिल २०२६ (गुरुवार) रोजी पार पडेल. गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक थोडे वेगळे आहे. ३० मार्च २०२६ (सोमवार) रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रे भरण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२६ (सोमवार) आहे आणि अर्जांची छाननी ७ एप्रिल २०२६ (मंगळवार) रोजी केली जाईल. उमेदवारांना ९ एप्रिल २०२६ (गुरुवार) पर्यंत आपले अर्ज मागे घेता येतील. या दोन्ही राज्यांमध्ये २३ एप्रिल २०२६ (गुरुवार) रोजी मतदान घेतले जाईल.

Baramati Rahuri by poll
कीर्तनकाराचं काळं कृत्य, पक्कडीने चटके देऊन अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार, अहिल्यानगर हादरले

कोणत्या ठिकाणी पोटनिवडणूक होणार? कारण काय?

गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड आणि त्रिपुरा या सहा राज्यांतील ८ रिक्त जागा भरण्यासाठी आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. गोव्यातील पोंडा विधानसभा मतदारसंघाची जागा रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. गुजरातमध्ये गोविंदभाई रायजीभाई परमार यांच्या निधनामुळे उमरेठ या जागेवर निवडणूक घेतली जाईल. कर्नाटक राज्यात दोन जागांसाठी मतदान होणार आहे. यात बागलकोटमधील मेटी हुल्लप्पा यमनप्पा यांच्या निधनामुळे आणि १०७ दावणगेरे दक्षिणमध्ये शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाल्या आहेत. महाराष्ट्रातही दोन मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे. यात राहुरी येथील जागा शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे, तर २०१-बारामती येथील जागा अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. नागालँडमधील कोरिडांग (ST) ही जागा इमकोंग एल. इमचेन यांच्या निधनामुळे आणि त्रिपुरातील धर्मनगरची जागा बिस्वा बंधू सेन यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. या सर्व जागी पोटनिवडणूक होणार आहे.

Baramati Rahuri by poll
धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराजांचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वत:वरच केले वार

निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

Baramati Rahuri by poll
रीलस्टारनं निवृत्त प्राध्यापकाचा थंड डोक्यानं केला खून, मृतदेह जंगलात पुरला; ४० दिवसांनंतर झाला भंडाफोड, संभाजीनगर हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com