Baramati News: शेतजमिनीचा वाद; तहसील कार्यालय आवारात शेतकऱ्याने घेतले पेटवून

शेतजमिनीचा वाद; तहसील कार्यालय आवारात शेतकऱ्याने घेतले पेटवून
Baramati News
Baramati NewsSaam tv
Published On: 

बारामती : बारामती तहसील कार्यालयातील आवारात धक्कादायक घटना घडली. इंद्रापूर तालुक्यातील शेतकऱ्याने (Farmer) जमिनीच्या वादातून रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे (Baramati) तहसिल कार्यालयात खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

Baramati News
Jalgaon News: वीज पडून तरूणाचा मृत्यू; घरांची पत्रेही उडाली

मिळालेल्या माहितीनुसार बावडा पोलिसांनी व जंक्शन पोलिसांनी तक्रार कामात दिरंगाई केल्याने शेतकऱ्यावर पेटवून घेत आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे प्रशासन या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कोणत्या भूमिकेने पाहणार आणि ज्या पोलिसांनी कामात दिरंगाई केली. त्यांच्यावर चौकशी होऊन काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Baramati News
Dhule News: मनपा आयुक्त कार्यालयात गळफास घेण्याचा प्रयत्न; अतिक्रमणाला कंटाळला होता इसम

शेतकरी उपचारासाठी दाखल

बारामती तहसील कार्यालयात हा धक्‍कादायक प्रकार आज घडला आहे. बारामती शहर पोलिसांनी (Police) तात्काळ त्याठिकाणी जात त्या शेतकऱ्याला ताब्यात घेत त्याला पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.