Baramati News : रणजीत निंबाळकर हत्या प्रकरणात गौतम काकडेला अटक; सुंदर बैलाच्या व्यवहारातून झाला होता गोळीबार

Ranjit Nimbalkar Firing News : बारामती तालुक्यातील निंबुत गावात सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून गोळीबार झाला होता. यामध्ये रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाला होता.
Baramati Ranjit Nimbalkar Firing News
Baramati Ranjit Nimbalkar Firing NewsSaam TV

बारामती तालुक्यातील निंबुत गावात सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून गोळीबार झाला होता. यामध्ये रणजीत निंबाळकर यांना गोळी लागली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत निंबाळकर यांनी निंबुत येथील गौतम काकडे यांच्याकडून १ वर्षांपूर्वी सर्जा नावाचा बैल ६१ लाख रुपयांना विकत घेतला होता. त्यानंतर २४ जून २०२४ रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी ३७ लाखांना विकत घेतला.

यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी ५ लाख रुपये दिले होते. उर्वरित ३२ लाख रुपये येणे बाकी होते. दरम्यान, रणजीत निंबाळकर हे उर्वरित पैसे आणण्यासाठी निंबुत येथे गेले असताना काकडे आमि त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की गौतम काकडे याने रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला.

Baramati Ranjit Nimbalkar Firing News
Maharashtra Politics : लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीचं उदाहरण देत ठाकरे गटाचे अजित पवारांना चिमटे

या गोळीबारात निंबाळकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काकडे हा फरार झाला होता. दरम्यान, रणजीत यांच्या पत्नीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

आरोपी काकडे याला अटक करण्यासाठी त्यांनी आंदोलन देखील केले. इतकंच नाही, तर काकडेला अटक केली नाही तर आत्मदहन करेन, असा इशाराही मृत निंबाळकर यांच्या पत्नीने दिला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासा गौतम काकडे यांना पोलिसांनी केली अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आधीच गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना आधीच केली होती.

Baramati Ranjit Nimbalkar Firing News
LPG Cylinder Price Cut : खुशखबर! गॅस सिलिंडरच्या दरात कपात, जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com