- चेतन व्यास
Wardha News : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजप नेत्याने लावलेला बॅनर हा शासकीय कार्यालयाच्या आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे बातमी साम टीव्हीने प्रसारित केली. या बातमीची दखल जिल्हा प्रशासनाने तत्काळ संबंधित बॅनर हटविला आहे. (Maharashtra News)
शासकीय कार्यालय बाबत शासनाची आचारसंहिता पूर्वीपासून बनलेली आहे. सर्वच राजकीय पक्षांना त्या आचारसांहितेच पालन करणे गरजेचे आहे. त्यातच शासकीय योजनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर जिल्ह्याच्या एका भाजपा पदाधिकाऱ्याने चक्क नवनियुक्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभेच्छांचा बॅनर लावला.
आमदारकीचे डोहाळे लागलेल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच शुभेच्छांचा बॅनर लावल्याने चर्चेचा विषय़ झाला. तसेच यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले गेले. शासकीय कार्यालयाच्या आचारसंहितेचे उल्लंघन करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॅनर लावणाऱ्या नेत्यावर काय कारवाई हाेणार याची देखील चर्चा झडली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॅनर लावणा-या भाजप नेते राजेश बकाने यांच्यावर कारवाई हाेणार का ही वर्धा शहरात सुरु असलेल्या चर्चेचे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा प्रशासनाने संबंधित बॅनर घटनास्थळावरुन हटवला.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने परिसरातील संबंधित बॅनर काढल्यामुळे पालकमंत्र्यांना शुभेच्छा देण्या-या उतावळ्या नेत्याला चांगलीच चपराक बसली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.