दरबारात या..दिव्यशक्ती दाखवतो, बागेश्वर बाबाचं अंनिसला आव्हान

Dhirendra Shastri vs ANiS: छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर बाबा पुन्हा एकदा चर्चेत आलाय... बागेश्वर बाबानं यावेळी थेट अंधश्रद्धा निर्मुलन समितीला आव्हान देत दरबाराच दिव्य शक्ती दाखवण्याचा दावा केलाय...मात्र बागेश्वर बाबांच्या याचं आव्हानाला अंनिसनं कसं प्रत्युत्तर दिलयं...
Bageshwar Baba (Dhirendra Shastri) during a public darbar as controversy over divine power claims intensifies.
Bageshwar Baba (Dhirendra Shastri) during a public darbar as controversy over divine power claims intensifies.saam tv
Published On

नागपुरात सध्या 3 वर्षांपूर्वी अंनिसच्या श्याम मानवांनी दिलेल्या या ओपन चॅलेजची चांगलीच चर्चा रंगलीय.. आणि त्याला कारण ठरलंय...बागेश्वर बाबानं अंनिसला दिलेलं प्रतिआव्हानं....दिव्य दरबारात लोकांच्या मनातले विचार न सांगता कागदावर लिहून समस्य़ा सोडवणारे...स्वत:वर हनुमानाची कृपा असल्याचं सांगून भूत उतरवण्याचा दावा करणारे हे आहेत... बागेश्वर ऊर्फ धीरेंद्र शास्त्री....

याचं बागेश्वर बाबांच्या तथाकथित सिद्धीला 2023 साली श्याम मानवांनी आव्हान देत 30 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं...मात्र त्यावेळी यावर कुठलीच थेट प्रतिक्रिया न देणारे धीरेंद्र शास्त्री आता महाराष्ट्रात येऊन दरबारात येण्याचं आव्हान देतायेत. दुसरीकडे अंनिसनं धीरेंद्र शास्त्रींनी दिलेलं हे आव्हानं स्विकारलंय एवढंच नव्हे तर चमत्कार सिद्ध केला तर 30 लाखांऐवजी थेट 80 लाख रुपये बक्षीस म्हणून देऊ अशी घोषणाही केलीय. त्यामुळे अंनिसचं चॅलेज काय आहे?

नागपूर पत्रकार संघात 10 व्यक्तींना ऐनवेळी धीरेंद्र शास्त्रींपुढे आणले जाईल...त्या 10 जणाच्या वडीलांचे नाव, वय, मोबाईल नंबर बागेश्वर बाबांनी एका कागदावर लिहून द्यावे... तो कागद सीलबंद करून पंचांच्या समोर सुरक्षित ठेवला जाईल...पंचांच्या कमिटीत पाच लोकांचा समावेश असेल... त्या 10 व्यक्तींची सर्व माहिती धीरेंद्र शास्त्रींना लिहून द्यावी लागेल...त्याव्यतिरिक्त एका खोलीत 10 वस्तू ठेवल्या जातील...त्याचे व्हिडिओ रेकॉर्डींग सुरु ठेवून दुसरीकडे धीरेंद्र शास्त्रींनी बाजूच्या खोलीतून दिव्यशक्तीद्वारे त्या वस्तुंची नावे एका कागदावर लिहून द्यावीत...ही प्रक्रिया दोन वेळा होईल...या दोन्ही आव्हानांपैकी एक जरी गोष्ट 90 टक्के बरोबर निघाली तर 80 लाख रुपयाचं बक्षीस धीरेंद्र शास्त्रींना दिलं जाईल...

एकीकडे धीरेंद्र शास्त्रीनी नागपूरातील रेशीमबाग मैदानात येऊन दिव्य शक्तींचा अंदाज घेण्याचं आव्हानं दिलयं.. तर दुसरीकडे श्याम मानव यांनी नागपूरच्या पत्रकार संघात पत्रकारांसमोर दिव्य शक्तीचा चमत्कार करून दाखवण्याचं खुलं आव्हानं दिलयं..धीरेंद्र शास्त्री श्याम मानव याचं आव्हानं स्विकारतात की 2023 प्रमाणे श्याम मानवांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करून पुढच्या दिव्य दरबाराला रवाना होतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com