Bachchu Kadu: निर्णयाची तारीख सांगा, नाहीतर..., बच्चू कडू लवकरच मोठी घोषणा करणार

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून अजूनही सरकारने निर्णय घेतलेला नाही. कर्जमाफीसाठी लवकर निर्णय न झाल्यास त्यांनी १६ तारखेला जलत्यागाचा इशारा दिला आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam tv
Published On

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी ते गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र अद्यापही सरकारकडून त्यांच्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. जर आज सरकारकडून निर्णय घेण्यात आला नाही, तर उपोषणासह जलत्यागाचाही इशाराही त्यांनी दिला आहे.

कर्जमाफीवरून बच्चू कडू म्हणाले, "कर्जमाफीचा निर्णय खूप आधी व्हायला हवा होता. सरकार आता या विषयावर बोलतंय खरे, पण अजूनही कर्जमाफीचा अहवाल कधी येणार आणि निर्णय नेमका केव्हा होणार, याची कोणतीही स्पष्टता दिलेली नाही," अशी तीव्र प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. "फक्त बोलून चालणार नाही. निर्णयाची तारीख तरी सांगा," असा सवालही त्यांनी सरकारला केला.

Bachchu Kadu
Ahmedabad Airplane Crash: 'बाबा, काळजी करू नका...', रिक्षा चालवून वडिलांनी मुलीला शिकवलं; नोकरीसाठी लंडनला पोहण्याआधीच मुलीचा करुण अंत

"पोलिसांचा चोख बंदोबस्त ठिकठिकाणी लावला आहे. मात्र आमचे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीत. रोज मरण्यापेक्षा एकदाच मरण परवडेल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे," असं सांगत बच्चू कडूंनी आपल्या कार्यकर्त्यांना कोणताही आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारला इशाराही दिला आहे. "आज निर्णय झाला नाही, तर १६ तारखेला जलत्याग करणार," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी इशारा दिला.

Bachchu Kadu
Kamal Kaur Bhabi: अश्लील VIDEO पोस्ट केल्यावरून वाद टोकाला गेला, ‘कमल कौर भाभी’ची हत्या

"पुण्यात माझ्या कार्यकर्त्यांवर आक्रमण झालं आहे. माझी तब्येतही खालावत चालली आहे. सरकार निर्णय घेत नाही, म्हणूनच कार्यकर्ते आंदोलन करत आहेत," असे बच्चू कडू म्हणाले. दरम्यान आज दुपारी २ वाजचा बच्चू कडू प्रसारमाध्यांना आपल्या निर्णयाबाबत माहिती देणार आहेत.

Bachchu Kadu
Kolhapur: सायको बॉयफ्रेंड! लॉजवर नेलं अन् दरवाजा बंद.., बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडवर हातोड्यानं..

दरम्यान आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात भाषणेवेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अमरावतीच्या शेतकऱ्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालून ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवारांचा जाब विचारताच शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बच्चू कडूंना न्याय द्या,अशी मागणी करत घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com