एकनाथ शिंदेंसोबत जाणार का? बच्चू कडूंच्या भूमिकेने महाराष्ट्रात खळबळ, नेमकं काय म्हणाले?

Bachchu Kadu latest news : बच्चू कडू यांनी शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचा प्रस्ताव नाकारला असला तरी शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी अटींवर समर्थन देण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
Bachchu Kadu press statement
Bachchu Kadu addressing media while clarifying his stand on Shiv Sena mergerSaam TV Marathi
Published On

Bachchu Kadu press conference political statement details : आमदारकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याइतका नालायक नाही, असे स्पष्ट करत बच्चू कडू यांनी आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेची आमदारकी आणि मंत्रिपद देण्याची ऑफर दिली होती, पण त्यासाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची अट ठेवली होती. यावर बच्चू कडू यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. "विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून जाणार नाही," असेही यावेळी ते म्हणाले. पण शेतमजूर, दिव्यांगासाठी एकनाथ शिंदेंसोबत जाऊ शकतो, असे म्हणत कडू यांनी शिवसेनेसोबत जाणार असल्याचे संकेत दिले.

माजी मंत्री आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. "जनतेसाठी काम करणारा आमचा पक्ष आहे. मुद्दा असेल तरच युती करणारा माझा पक्ष आहे. सामंतांसोबत चर्चा झाली, पण कोणतीही स्पष्टता नाही. एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव मला मीडियातून समजला. पत्रकार परिषदेनंतर एकनाथ शिंदेंचा निरोप आला तर त्यांना भेटेन. शिंदेंसोबत आमच्या सर्व मागण्या मांडणार आहे," असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu press statement
BJP Candidate List : भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र! ५ नव्या चेहऱ्यांना विधान परिषदेवर संधी, वाचा कुणाला मिळाली संधी? कुणाचा पत्ता कट?

"मी 'कडू' आहे, चेहरा आनंदी ठेवला नाही तर अजून कडू होईल," असा मिश्किल टोलाही यावेळी त्यांनी लगावला. "शिवसेना ही मातीतील संघटना आहे. मला कार्यकर्त्यांकडून १५ ते २० हजार मेसेज आले, मी विधान परिषदेवर जावे अशी लोकांची इच्छा आहे," असे बच्चू कडू म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले.

Bachchu Kadu press statement
Massajog Sarpanch : संतोष देशमुखांच्या पत्नीचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव, कोण झालं विजयी?

"राजकीय निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारे असावेत. पुढे पाऊल टाकताना मोजून-मापून टाकावे लागेल. तुम्ही पेढे घेऊन या; सर्व निर्णय आताच सांगितले तर लोक राजनेता म्हणतील का?" असा सवाल यावेळी बच्चू कडू यांनी उपस्थित केला. "गौतम बुद्धांच्या भूमीत जाऊन आलो, संयम ठेवला. पण आता शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांवर संयम ठेवणार नाही. आमच्या अनेक मागण्या आहेत, त्या शिंदेंसमोर मांडणार आहे," असे बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu press statement
Accident : लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; नववधूसह तिघांचा मृत्यू, भीषण अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com