शेतकरी, बेरोजगारी आणि ऊसतोड कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे लढवय्ये नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संघर्षशील नेते अशी बबनराव ढाकणे यांची ओळख होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांच्यावर अहमदनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. निमोनियाचं निदान झाले होते. तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. काल, गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. यात त्यांचे निधन झाले.
पंचायत समितीपासून जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा राजकीय प्रवास होता. बबनराव ढाकणे चार वेळेस आमदार आणि खासदार म्हणून ते लोकसभेवर निवडूनही गेले होते. राज्यात बांधकाम विभाग, ग्रामविकास विभागाचे मंत्रिपदही त्यांनी भूषवले होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात ते राज्यमंत्री होते. जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांतही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.
बबनराव ढाकणे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथे ठेवण्यात येणार आहे. उद्या, शनिवारी दुपारी पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.