अयोध्येच्या राम मंदिरातून 5 कोटींची चोरी, प्रभू श्रीरामाचे करोडो रुपये चोरीला, जाब विचारण्यासाठी ठाकरेसेना अयोध्येला जाणार

Ram Mandir Donation Box Controversy: अयोध्येच्या राम मंदिरातून 5 कोटींची चोरी झालीय... मात्र ही चोरी नेमकी कोणी आणि का केली? राममंदिरात नेमका कोणता घोटाळा झालाय... हिंदूंचं श्रद्धास्थान असणाऱ्या राम मंदिरातील दानपेटींवर नेमका कोणाचा डोळा होता? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Security concerns rise as alleged ₹5 crore donation theft at Ayodhya Ram Temple sparks nationwide debate.
Security concerns rise as alleged ₹5 crore donation theft at Ayodhya Ram Temple sparks nationwide debate.saam tv
Published On

अयोध्येच्या राम मंदिरासाठी कैक पिढ्या झटल्या, शहीद झाल्या.. ज्या राम मंदिरासाठी बाबर पासून आजतायगत लढावं लागलं, रस्त्यावरची लढाई.. न्यायालयीन लढाई लढून रामलल्ला ज्या मंदिरात विराजमान झाले. त्याच रामलल्लाच्या अयोद्धेतील मंदिरातच ५ कोटींचा दरोडा घातल्याचा खळबळजनक आरोप करण्यात येतोय. होय. तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय. कोट्यावधी रामभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांवर हा डल्ला मारण्यात आलाय. याहूनही धक्कादायक म्हणजे भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यानं या घोटाळ्याची पाळेमुळे किती खोलवर गेलीयेत, याची साक्ष मिळते. त्यांनी राम मंदिरातल्या या कोट्यवधींच्या चोरी प्रकरणात काय म्हटलं ते जरा नीट ऐका.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करुन त्यांना अयोद्धेत येऊ न देणारे बृजभूषण सिंह यांना नेमकी कोणाची भिती वाटते? बृजभूषण सिंह हे कधीकाळी पेहलवान राहिलेत. कुस्ती महासंघाचे प्रमुख भाजपचे माजी खासदार असून देखिल या घोटाळ्यातील नावं ते समोर का आणत नाही असा सवाल उपस्थित होतोय. पण हे सगळं प्रकरण नेमंक काय ते देखिल पाहा,

राम मंदिरात कशी झाली चोरी?

राम मंदिर दानपेटीतील पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रक्कम गायब केल्याचा आरोप

गुप्त सीसीटीव्हीमुळे चोरी उघड मात्र आता सीसीटिव्ही गायब केल्याचा दावा

दानपेटीतील 5 तेी 7 कोटींचा अपहार झाल्याचा दावा

पोलिसांनी 4 संशयित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 लाखांची वसूली

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं नियमित ऑडिट सुरू असल्याचा केला दावा

तर दुसरीकडे याचे आता महाराष्ट्रातही पडसाद उमटले आहेत. यावरून ठाकरेसेने आक्रमक झालीय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात थेट अयोध्येत धडक देण्याची तयारी ठाकरेसेनेनं केलीय. तर भाजपनं त्यांना प्रत्युत्तर दिलंय. राम मंदिराच्या निर्माणासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतः १ कोटी रुपयांचं दान दिल्याच्या दावा राऊतांनी केलाय. त्यामुळेच अयोध्येतील या दानपेटीतील चोरीमुळे खुद्द उद्धव ठाकरे अस्वस्थ झालेत आणि आता उद्धव ठाकरेंनी स्वतः या विषयाला तोंड फोडण्यासाठी अयोध्येला जाण्याचं रणनीती आखलीय. त्यामुळे आता राम मंदिराच्या या दानपेटीतील चोरी प्रकरणावरून राजकारण पेटणार हे नक्की. मात्र यातल्या खऱ्या सुत्रधारांचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कडक कारवाई होणार की प्रकरण दाबलं जाणार याकडे समस्त रामभक्तांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com