
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बाइक टॅक्सी संदर्भात घेतलेल्या निर्णयाला रिक्षा चालक संघटनेकडून विरोध होत आहे. पुण्यातील रिक्षा चालक संघटनांनी आवाज उठवत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळ्यात आले आहे. तसेच शिंदे यांच्या लोकप्रिय ठरलेल्या योजना देखील बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलाय. याच दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. यातून शिंदे सेनेतील नेते प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय.
महायुतीच्या नेत्यांमध्ये आलबेल नसल्याचं चित्र आहे. नेत्यांच्या निर्णयांवरून मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाला रिक्षा चालकांनी विरोध दर्शवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं दिसत आहे. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिपद, पालकमंत्रिपद यावरून शिंदेंनी बऱ्याचदा नाराजी व्यक्त केलीय. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी पाहायला मिळाली.
शिंदे साहेब देवमाणूस
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये प्रताप सरनाईक यांच्या बाइक टॅक्सी निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या योजना सुरू ठेवण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
काय लिहिलंय बॅनरमध्ये?
'सरानाईक साहेब प्लीज एकनाथ शिंदे हे देव माणूस आहेत, त्यांचे निर्णय बदलू नका', अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर कुणी लावले आहेत, ही बाब अद्याप समोर आलेली नाही.
सरनाईकांच्या कोणत्या निर्णयावर विरोध?
१९ जानेवारीला बेकायदा बाइक टॅक्सीवर बंदी आणण्यासाठी जीआर काढण्यात आला होता. परंतु, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनी केलेल्या घोषणाचे रिक्षा चालकांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांकडून बॅनर लावण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.