Crime News: किरकोळ वादातून डोक्यावर दारूची बाटली फोडली, जिथे गुन्हा घडला तिथेच धिंड काढली

Chikhali Two Men Assault Shopkeeper: पानपट्टीवर एका व्यक्तीचा नंबर देत नसल्याच्या रागातून, आरोपींनी एका व्यक्तीच्या डोक्यात दारूची बाटली फोडत मारहाण केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv News
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

किरकोळ वादातून एकावर दोन जणांनी मारहाण करत डोक्यावर दारूची बाटली फोडली आहे. ही धक्कादायक घटना बुलढाण्यातील चिखली शहरातील जयस्तंभ चौक परिसरात घडली आहे. राजू आणि बबलू या दोन तरूणांनी अशोक माटे यांच्या पानपट्टीत येऊन एका व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितला होता. नंबर देत नसल्याच्या रागातून माटे यांच्या डोक्यावर दारूची बाटली फोडण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी कारवाई करत आरोपींची धिंड काढली आहे.

चिखली शहरातील जयस्तंभ चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास भररस्त्यात एकाच्या डोक्यात आरोंपीनी दारूची बाटली फोडत मारहाण केली आहे. राजू आणि बबलू या दोन तरूणांनी अशोक माटे यांच्या पानपट्टीत येऊन एका व्यक्तीचा मोबाईल नंबर मागितला होता.

Crime News
Plane accident: विमानतळावर २ विमानांची टक्कर, एकाचा मृत्यू, ४ जण जखमी; विमानाचा झाला चकणाचूर

अशोक माटे यांनी नंबर देण्यास नकार दिला. माटे यांनी नंबर नसल्याचं सांगताच राजू आणि बबलू या दोघांनी माटे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत माटे यांच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून गंभीर दुखापत केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या माटे यांच्या मुलालाही या युवकांनी बेदम मारहाण केली.

Crime News
Kolhapur News: परीक्षा देऊन घरी येताना काळाचा घाला, ऊसाचा ट्रॅक्टर अंगावरून गेला; कोल्हापुरात हळहळ

या हिंसाचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चिखली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने कारवाई करत राजू आणि बबलू या दोघांना ताब्यात घेतलंय. त्यानंतर ठाणेदार संग्राम पाटील यांनी आरोपींची शहरातून धिंड काढली आहे. अशा कारवाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये विश्वास वाढेल आणि कायद्याचे शासन प्रभावीपणे टिकून राहील, असे मत नागरीकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com