
- नवनीत तापडिया
Aurangabad : औरंगाबाद येथील बिल्डर (builder) अनिल अग्रहारकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. अग्रहारकर यांना तीन कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने एका 68 लाख रुपये उकळल्याची माहिती पुढे आली आहे. पाेलिसांनी (police) कलम 306 नूसार या प्रकरणी एकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (aurangabad latest marathi news)
औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक तथा क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर यांनी बुधवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली होती. पाेलीसांनी या प्रकरणाचा कसून तपास करावा अशी मागणी देखील केली गेली हाेती.
दरम्यान अनिल अग्रहारकर यांच्या भावाने जवाहर नगर पोलिस ठाण्यात एकाबाबत तक्रार दिली. त्यानुसार शहरातील प्रॉपर्टी डीलर भागवत चव्हाण यांच्याविरुद्ध पाेलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. चव्हाण यांच्यावर कलम 306 नूसार गुन्हा दाखल केल्याचे पाेलीसांनी सांगितलं.
हा गुन्हा जवाहर नगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. चव्हाण हे अग्रहाकर यांना 30 कोटी रुपयांचे कर्ज देणार होते. त्यासाठी त्यांनी 68 लाख रुपये घेतले. पैसे घेऊनही कर्ज मिळवून दिले नाही. त्यामुळे अडचणीत आलो आहे. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे असे अग्रहाकर यांनी त्यांच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवल्याचे त्यांच्या भावाने सांगितलं.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.