Sanjay Shirsath News : औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबई (Mumbai) येथील लिलावती रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. दरम्यान, संजय सिरसाट यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Sanjay Shirsath Latest News)
आमदार संजय शिरसाट यांच्यावर लिलावती रुग्णालयातच हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान संजय शिरसाठ यांच्या हृदयात ब्लॉकेज आढळला होता.या ब्लॉकेज मुळे रक्तवाहिन्या बंद पडण्याचा धोका वाढला होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
सध्या संजय सिरसाट यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलंय. शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर संजय शिरसाट यांना विशेष एअर एम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले.
वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सोमवारी औरंगाबादमथधील एका रुग्णालयात शिरसाट यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ मुंबईत आणण्यात आले.
शिवसेनेचे उमेदवार म्हणून शिरसाट सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाट देखील सामील होते. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरु होती.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.