Ram Mandir : राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट, पुन्हा उभारायची होती मशिद; PFI चे धक्कादायक मनसुबे उघड

अटकेत असलेल्या संशयितांनी परदेशात वास्तव्य केल्याचंही तपासात समोर आल्याची माहिती ATS ने न्यायालयात दिली आहे.
Ram Mandir- PFI
Ram Mandir- PFISaam Tv
Published On

>> अभिजीत सोनवणे

नाशिक : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) पॉप्युल फ्रंड ऑफ इंडिया अर्थात PFI च्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ATS च्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. अयोध्येतील राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद उभारण्याचा PFI चा डाव होता. मात्र NIA, ATS आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांनी मागच्या महिन्यात देशभरात एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करून PFI च्या मुसक्या आवळल्याने मोठा घातपात टळला आहे.

Ram Mandir- PFI
मुंबई असुरक्षित बनतेय? २०१२ ते २०२१ दरम्यान बलात्काराच्या घटनांमध्ये २३५% वाढ, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून अनेक प्रश्न उपस्थित

अयोध्येतील राम मंदिर पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांच्या रडारवर असल्याचं समोर आलंय. देशविघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात PFI च्या अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. PFI च्या मॉड्युलमध्ये २०४७ पर्यंत भारत देश संपूर्ण मुस्लीम राष्ट्र बनवण्यासह बाबरी मशिदीच्या जागी उभारण्यात येणारं राममंदिर पाडून पुन्हा तेथे मशिद उभारण्याचा डाव होता, असं चौकशीत समोर आलं आहे. अटकेत असलेल्या संशयितांनी परदेशात वास्तव्य केल्याचंही तपासात समोर आल्याची माहिती ATS ने न्यायालयात दिली आहे. (National News)

बंदी घातलेल्या ‘सीमी’च्या धर्तीवरच कामकाजाची पद्धत असलेल्या PFI वर २३ सप्टेंबरला देशभरात छापेमारी करण्यात आली. तर राज्यातील मालेगाव, पुणे, बीड आणि कोल्हापुरातून ५ जणांना अटक करण्यात आली होती. ATS ने अटक केलेल्या PFI च्या संशयितांपैकी अनेक जणांनी परदेश दौरे केले असून तिथं वास्तव्यही केलंय. त्यामुळे या संघटनेला परदेशातून मोठा आर्थिक फंड मिळत असावा अथवा संशयितांमध्येही आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.

Ram Mandir- PFI
Russia-Ukraine युद्धाचा क्रूर चेहरा; महिलांवर बलात्कारासाठी रशियन सैन्याला वायग्राचा पुरवठा, मुलं-पुरुषांवरही अत्याचार

तर संशयितांच्या हार्ड डिस्कमधूनही आणखी महत्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ राम मंदिरच PFI च्या निशाण्यावर होते की देशभरात हल्ल्याचा आणखी मोठा कट PFI च्या डोक्यात शिजत होता? PFI च्या २०४७ मॉड्यूलमध्ये आणखी काय टार्गेट आहेत? असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरित असून ATS च्या तपासातून लवकरच PFI चे सर्व मनसुबे उघड होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com