Nashik News : नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई ; ३ बांगलादेशी संशयित घेतले ताब्यात, काय आहे प्रकरण?

ATS Detained three people suspects are Bangladeshis : नाशिकमध्ये एटीएसने मोठी कारवाई केलीय. बांगलादेशी असल्याच्या संशयातून तिघांना ताब्यात घेतलंय.
बांगलादेशी संशयित घेतले ताब्यात
Nashik NewsSaam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आलीय. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात एटीएसने मोठी कारवाई केलीय. तीन संशयतांना एटीएस पथकाने ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेले तीन संशयित बांगलादेशी असल्याची माहिती सूत्रांनी (Nashik News) दिलीय. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात एटीएसकडून सर्च ऑपरेशन राबविण्यात आलं होतं.

काय आहे प्रकरण?

बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करत प्रवेश करत अवैधमार्गाने भाडेतत्वावर पाथर्डी गावात राहत असल्याचा आरोप केला गेलाय. यामध्ये बांगलादेशी इसम शागोर मोहंमद अब्दुल हसुने माणिक (२८), मुस्समत शापला खातून (२६), इति खानम मोहंमद शेख (२७, सर्व रा. काजी मंजील, पाथर्डी गाव) यांच्यासह त्यांना वास्तव्यासाठी सर्वोतोपरी मदत देणारा संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव (३२) यांना अटक केली (ATS Detained three people) आहे.

बांगलादेशी संशयित घेतले ताब्यात
Terrorist Attack : भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट; गुजरातमध्ये लपवली शस्त्रे, ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

शहरात अवैध वास्तव्य

यांच्याविरूद्ध दहशतवादविरोधी (Bangladeshi) पथक नाशिक युनिटच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक योगिता पांडुरंग जाधव (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत. शहरात अवैध वास्तव्य करणार्‍या तीन बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी केली जातेय.

बांगलादेशी नागरिकांना अटक

पिंपरी चिंचवडमध्ये देखील चार बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याचं २ ऑगस्ट रोजी समोर आलं होतं. देशात वास्तव्यासाठी लागणारी वैध परवानगी न घेता चार बांगलादेशी नागरिक पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहत (Bangladeshis in Nashik) होते. याबाबत सांगवी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चारही जणांना ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता नाशिकमध्ये एटीएसने मोठी कारवाई केल्याचं समोर आलंय.

बांगलादेशी संशयित घेतले ताब्यात
Gujarat ATS Seized Drugs: भिवंडीत ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त; गुजरात ATSची धडक कारवाई, ३ भावांनी फ्लॅटमध्ये टाकली होती Drugsची फॅक्टरी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com