Terrorist Attack : भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट; गुजरातमध्ये लपवली शस्त्रे, ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

Terrorist Attack in India : भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा इसिसचा कट होता, अशी धक्कादायक माहिती दहशतवादविरोधी पथकाने (ATS) केलेल्या तपासात समोर आली आहे
भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट; गुजरातमध्ये लपवली शस्त्रे, ATS तपासात धक्कादायक माहिती उघड
Terrorist Attack in IndiaSaam tv

प्रमोद जगताप, साम टीव्ही

भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा इसिसचा कट होता, अशी धक्कादायक माहिती दहशतवादविरोधी पथकाने (ATS) केलेल्या तपासात समोर आली आहे. दहशतवाद्यांसाठी गुजरातच्या अहमदाबादमध्ये शस्त्रे ठेवण्यात आली होती, असंही तपासात उघड झालं आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट; गुजरातमध्ये लपवली शस्त्रे, ATS तपासात धक्कादायक माहिती उघड
Kyrgyzstan News मोठी बातमी! किर्गिस्तानमध्ये हिंसाचार उफाळला; संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले

देशात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत असताना गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली होती. एटीएसने सोमवारी (ता. २०) अहमदाबाद विमानतळावरून इसिसच्या ४ दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं होतं. हे चारही दशतवादी श्रीलंका येथील असल्याची माहिती आहे.

भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी ते कोलंबो येथून चेन्नईला आले. त्यानंतर चेन्नईहून त्यांनी थेट अहमदाबाद गाठलं. दरम्यान, या चारही दहशतवाद्यांची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यांनी तातडीने गुजरात एसटीएसला या घटनेची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे एटीएस आणि इतर पोलीस कर्मचारी अहमदाबाद विमानतळावरच दबा धरून बसले होते. दहशतवादी विमानतळावर दाखल होताच एटीएसने त्यांना बेड्या ठोकल्या. सध्या या दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे.

आपण पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात असल्याचं चारही दहशतवाद्यांनी कबूल केलं आहे. भारतात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा इसिसचा कट होता. त्यासाठी आपण पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते, असं चौघांनीही कबूल केलं आहे. त्यामुळे एटीएस आता या हँडलर्सचा शोध घेत आहे.

भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट; गुजरातमध्ये लपवली शस्त्रे, ATS तपासात धक्कादायक माहिती उघड
NIA Raid: ब्रेकिंग! एनआयएकडून देशभरात ११ ठिकाणी छापेमारी; रामेश्वरम कॅफे प्रकरणात कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com