शेअर मार्केटिंगच्या नावाखाली ७३ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडवून ज्योतिष फरार

Astrologer Cheated Investor In Stock Market Nashik: नाशिकमध्ये शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून एका ज्योतिषाने ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Cyber Police Investigating ₹73 Lakh Stock Market Fraud by Absconding Astrologer in Nashik
Cyber Police Investigating ₹73 Lakh Stock Market Fraud by Absconding Astrologer in NashikSaam Tv
Published On
Summary

नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली ७३ लाखांची मोठी फसवणूक

जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्योतिषाने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला

एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान विविध खात्यांत पैसे जमा

संशयित सचिन देशमुख फरार, सायबर पोलिसांकडून तपास सुरू

नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचे पोलिसांचे आवाहन

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: भविष्य सांगण्याच्या बहाण्याने शेअर मार्केटिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवत एका ज्योतिषाने ४८ वर्षीय किराणा दुकानदाराची तब्बल ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित दुकानदाराने शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम ज्योतिषाच्या सांगण्यावरून विविध खात्यांत जमा केली होती. एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही रक्कम वेगवेगळ्या टप्प्यांत जमा करण्यात आली. मात्र, अपेक्षित परतावा न मिळाल्याने संशय बळावला.

त्यानंतर पीडिताने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक तपासात संशयित सचिन देशमुख याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सचिन देशमुख हा पूर्वी आपण एनएसजी कमांडो होतो, असा दावा करायचा. लोकांना कुंडलीवरून ज्योतिष सांगता सांगता आर्थिक संकटातून बाहेर पडायचं असेल तर माझ्याकडे गुंतवणूक करा, मी पैसे डबल करून देतो असा दावा करायचा. त्याच्या आमिषला बळी पडून अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक त्याच्याकडे केली.

मात्र देशमुख फरार झाल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदार सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सुमारे २० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संशयिताने ऑनलाइन झूम मीटिंग्स तसेच प्रत्यक्ष भेटींद्वारे गुंतवणुकीस प्रवृत्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुंतवणुकीच्या बदल्यात मोठ्या नफ्याचे आश्वासन देत विश्वास संपादन करण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आणखी फसवणुकीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com