भोंदू अशोक खरातकडून मंदिराच्या परिसरात नरबळी? पोलिसांच्या तपासाला वेग

ashok kharat news update : भोंदू अशोक खरातकडून मंदिराच्या परिसरात नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे.
ashok kharat news update
ashok kharat news Saam tv
Published On
Summary

भोंदूबाबा खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

खरातने ५ नरबळी दिल्याचा संशय कोर्टात व्यक्त

नरबळीच्या संशयानंतर पोलिसांकडून तपासाला वेग

सचिन बनसोडे, साम टीव्ही

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे. भोंदू खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत त्याच्या विरोधात ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याने ५ जणांचा नरबळी दिल्याचा संशय कोर्टात व्यक्त करण्यात आला. त्याने ५ नरबळी मंदिराच्या आवारात दिल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

भोंदू खरातला मंगळवारी नाशिक पोलिसांनी कोर्टात हजर केले. खरातचे समोर येत असलेल्या धक्कादायक करारनाम्यामुळे त्याची पोलीस कोठडी ५ दिवसांनी वाढवली. कोर्टात खरातने अघोरी कृत्यासाठी नरबळी दिल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

मिरगाव येथील त्याच्या आलिशान फार्महाऊसमध्ये पोलिसांनी बंदूक आणि काडतुसे हस्तगत केले आहेत. तर मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या आवारात असणाऱ्या ईशानेश्वर मंदिर आणि आमराईच्या परिसरात होमहवन आणि पूजाविधी करायचा. या परिसरातून नरबळी संशयाचे काही धागेदोरे पोलिसांना मिळतात का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

ashok kharat news update
बडे अधिकारीही खरातच्या जाळ्यात? खरातच्या 'दरबारा'तला डेप्युटी कलेक्टर कोण?

कोर्टात सरकारी वकील काय म्हणाले होते?

नाशिकमधील कोर्टात आणल्यानंतर सरकारी वकिलांनी त्याची कोठडी वाढवण्याची मागणी केली. कोर्टात युक्तिवाद करताना सरकारी वकील म्हणाले, 'खरातच्या घराच्या झडतीत राजमुद्रा सापडल्या. त्याने पिस्तुलाचा वापरून ५ जणांचा नरबळी दिल्याचा संशय आहे. त्याबाबतचे पुरावे देखील मिळाले आहेत. घरात विविध मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत. ६७ वर्षांचा आरोपी ३० वर्षांच्या मुलीवर अत्याचार करताना एका व्हिडिओत दिसत आहे. त्याने पिस्तुलाचा वापर करून ५ जणांचा नरबळी दिल्याचा संशय आहे'.

ashok kharat news update
चांगल्या आयुष्यासाठी असेल तर मला तुझं...; उच्चशिक्षित महिलांच्या रांगा, योनी शुद्धीकरण, खरातचा धक्कादायक कारनामा उघड

खरातची सलग सातव्या दिवशी चौकशी

भोंदूबाबा अशोक खरातची SIT कडून सलग सातव्या दिवशी चौकशी सुरू आहे. त्याची गोपनीय ठिकाणी SIT कडून चौकशी सुरू आहे. SIT प्रमुख तेजस्वीनी सातपुते यांच्या उपस्थितीत ही चौकशी सुरू आहे. सकाळी १० वाजता चौकशीला सुरुवात झाली. नाशिक कोर्टाकडून कालच ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. कोठडी वाढवताच पोलिसांनी दुसर्‍याच दिवशी चौकशीचा वेग वाढवला आहे. पोलिसांनी लैंगिक शोषणाचे विविध गुन्हे, आर्थिक व्यवहार आणि नेटवर्कवर लक्ष केंद्रित केलं आहे. SIT कडून सखोल चौकशी सुरूच आहे. खरात प्रकरणात अजून किती धक्कादायक खुलासे होणार, याकडं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com