Ashadhi Ekadashi 2022: श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी वारकरी प्रतिनिधी म्हणून मिळाला नवले दाम्पत्याला मान

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते झाली.
Ashadhi Ekadashi 2022
Ashadhi Ekadashi 2022Saam Tv
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून बीड जिल्ह्यातील रुई गावच्या मुरली भगवान नवले या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला. ( Ashadhi Ekadashi 2022 News In Marathi)

मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या गेल्या वीस वर्षापासून पायी आषाढी वारी करतात. ते संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सोबत पंढरपूरला पायी आले आहेत. त्यांना हा मान मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

Ashadhi Ekadashi 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

या वर्षी कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने वारीला परवानगी दिली होती. त्यामुळे यंदा वारकऱ्यांमध्ये उत्साह दुणावला होता. यावर्षी विदेशातील वारकरी देखील पंढरीला आले आहेत. आषाढीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा झाली आहे. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, स्वत: एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि संभाजी शिंदेंचा पणतू अशा चार पिढ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यंदा मानाचा वारकरी म्हणून मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला.

Ashadhi Ekadashi 2022
Daily Horoscope : आजचे राशीभविष्य 10 जुलै 2022

नवले दाम्पत्य हे बीड जिल्ह्यातील रुई गावचे रहिवासी आहेत. गेल्या मुरली नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या गेल्या वीस वर्षापासून पायी आषाढी वारी करतात. हे दाम्पत्य संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा सोबत पंढरपूरला पायी आले आहेत. यंदा मंदिर प्रशासनाने आषाढी एकादशीसाठी जय्यत तयारी केली आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली, रुक्मिणी पालखी, संत एकनाथ महाराज, संत सोपनकाका, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आदी या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com