Maharashtra Bhushan Award : श्रीसदस्यांना मोठा दिलासा; हार्बरवरील मेगा ब्लॉक रद्द

Mega Block : मेगा ब्लॉकसह इतर वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहे.
Maharashtra Bhushan Award
Maharashtra Bhushan AwardSaam Tv
Published On: 

Mega Block Cancel : महाराष्ट्र सरकारमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी उर्फ दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना जाहीर झाला.

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येत्या रविवारी 16 एप्रिल 2023 ला नवी मुंबईत (Navi mumbai) खारघर सेंट्रल पार्कमध्ये हा सोहळा रंगणार आहे.

Maharashtra Bhushan Award
Maharashtra Bhushan Award: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण, नवी मुंबईत रंगणार सोहळा!

या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा देखील उपस्थित राहाणार आहेत. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने श्रीसदस्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ठिक-ठिकणांवरुन येणाऱ्या श्रीसदस्यांसाठी हार्बर मार्गावरील वरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास देखील सुरळीत होणार आहे. तसेच ट्रान्सहार्बर व वेस्टन मार्गावरील मेगा ब्लॉक देखील रद्द करण्यात आला आहे.

Maharashtra Bhushan Award
Mumbai Traffic News: मुंबईला जोडणाऱ्या 3 महामार्गांवर दोन दिवस वाहतुकीत मोठा बदल; सलग सुट्ट्या आणि महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

1. रस्ते वाहतुकीत बदल -

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज दुपारी 2 वाजल्यापासून उद्या रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लोकं येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळायला हा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

2. शाळांनाही सुट्टी -

नवी मुंबईसह, पनवेलमधील सर्व शाळांना आज नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेनं सुट्टी जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.