Appasaheb Dharmadhikari: मोठी बातमी! आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून २५ लाखांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

Appasaheb dharmadhikari: डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी २५ लाखांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे.
Appasaheb dharmadhikari:
Appasaheb dharmadhikari:Saam tv
Published On

Appasaheb Dharmadhikari News: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी २५ लाखांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

आप्पासाहेब धर्माधिकारी या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, 'आजचा हा पुरस्कार (Award) माझ्या कार्याचा गौरव आहे, नानासाहेबांनी कष्ट केलं आणि तुम्ही साथ दिली, आजच्या या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं. एका घरात दुसरा पुरस्कार देणं ही घटना महाराष्ट्रात आतापर्यंत कुठेही झाली नाही'.

Appasaheb dharmadhikari:
Devendra Fadnavis: 'मन स्वच्छ करण्याचं रसायन आप्पासाहेबांच्या शब्दात'; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक

'आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहिरात करायची गरज काय आहे. मानवता धर्मात प्रत्येक मनुष्याने उभं रहावं. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील. माझ्यानंतर माझाा मुलगा हे कार्य पुढे नेईन. मला विश्वास आहे. सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करेल, असंही धर्माधिकारी म्हणाले. (Maharashtra Latest News)

Appasaheb dharmadhikari:
Eknath Shinde On Dharmadhikari । मला या महासागरामध्ये अप्पासाहेबांच्या रूपामध्ये देव दिसतो

'माझ्या आयुष्यातील हा भाग्याचा क्षण, पुरस्कार हा नेहमीच मोठा असतो,तो लहान कधीच नसतो. समाज आणि देशाचे आपल्यावर ऋण आहे, ते आपण फेडले पाहिजे. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय मी हे काम करत आहे, त्यामुळे तुम्हीही कार्य करा असे देखील धर्माधिकारी यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com