Devendra Fadnavis: 'मन स्वच्छ करण्याचं रसायन आप्पासाहेबांच्या शब्दात'; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक

'मन स्वच्छ करण्याचं रसायन आप्पासाहेबांच्या शब्दात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam tv

Devendra Fadnavis News: यंदाचा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.'मन स्वच्छ करण्याचं रसायन आप्पासाहेबांच्या शब्दात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'खरी श्रीमंती ही संस्कारांमध्ये आहे. ही श्रीमंती श्री परिवारामध्ये अनुभवायला मिळते. जगात श्रीमंत कोणी असाल, तर तुम्ही आहात. कारण नानासाहेब आणि आप्पासाहेब यांच्या विचारांची श्रीमंती घेऊन तुम्ही जीवन जगत आहात. मला वाटतं की तुमच्यापेक्षा श्रीमंत दुसरे कोणीच या ठिकाणी असू शकत नाही. ज्या प्रकारे आदरणीय आप्पासाहेबांनी निरूपणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक सकारात्मकता दिली आहे, ती कौतुकास्पद आहे'.

Devendra Fadnavis
जेष्ठ निरुपणकार Appasaheb Dharmadhikari यांना आज Maharashtra Bhushan शहांच्या हस्ते पुरस्कार!

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'मन स्वच्छ केल्याशिवाय आनंद मिळत नाही. मन स्वच्छ करण्याचं रसायन हे खरे अर्थाने आप्पासाहेब यांच्या शब्दात आहे. आज आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार दिला. सरकारने त्यांना पुरस्कार देऊन कृतज्ञता व्यक्त केली'.

'मला असं वाटतं, नानासाहेबांचा पुरस्कार घेण्यासाठी आप्पासाहेब घेण्यासाठी आले होते. तेव्हाही लाखो लोक उपस्थित होते. मी इतिहासांचं अवलोकन करत होतो, धर्माधिकारी यांच्या घरांचा इतिहास साडे चार वर्षांपूर्वीचा आहे. खूप गोष्ट सांगता येईल. महाराष्ट्र भूषण हा आप्पासाहेबांना देत आहोत. त्याचं कार्य अफाट आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक जणांना लाभ झाला, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Appasaheb Dharmadhikari यांच्या पुरस्कार सोहळ्यात नागरिकांचा उत्साह!

' रक्तदान शिबीर केवळ भारतातच नव्हे, परदेशातही घेण्यात आले आहे. पश्चिमी विचार हा जगाला बाजार समजतो. भारतीय विचार जगाला बाजार समजत नाही. अमित शाह, तुम्ही या कार्यक्रमाला आले, त्याबद्दल तुमचे आभार, असे देखील फडणवीस म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com