Anna Hajare: दिल्लीतील विद्यार्थ्यांची अवस्था पाहून अण्णा हजारे भावुक, पाठिंब्यांसाठी मौन आंदोलन केलं सुरू

Anna Hajare On Delhi Protest: अण्णा हजारे यांनी मौन आंदोलनाला बसले आहेत. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनला त्यांनी पाठिंबा देत हे आंदोलन सुरू केले आहे.
Anna Hajare: दिल्लीतील विद्यार्थ्यांची अवस्था पाहून अण्णा हजारे भावुक, पाठिंब्यांसाठी मौन आंदोलन केलं सुरू
Anna Hajare NewsSAAM TV
Published On
  • दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा

  • अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांसाठी मौन आंदोलन सुरू केले

  • विद्यार्थ्यांची अवस्था पाहून अण्णा हजारे भावुक झाले

  • सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा असे मत अण्णांनी व्यक्त केले

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून राजकारण चांगलेच तापले आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. फरफटत नेत अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा सर्वस्तरावरून निषेध केला जात आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत या आंदोलनाला पाठिंबा दिला. आता या आंदोलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला. त्यांनी या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी मौन आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन सुरू करताना अण्णा हजारे यांच्या डोळ्यात अश्रू आले.

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून मौन आंदोलनास सुरुवात केली आहे. अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारक येथे मौन आंदोलनास सुरुवात करण्यात आली. भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून आंदोलनास सुरुवात होण्याआधी अण्णा हजारे यांच्या डोळ्यात अश्रू आले. आजारी असतानाही अण्णा हजारे यांनी आंदोलनास हजेरी लावली.

Anna Hajare: दिल्लीतील विद्यार्थ्यांची अवस्था पाहून अण्णा हजारे भावुक, पाठिंब्यांसाठी मौन आंदोलन केलं सुरू
CJP Protest : दिल्लीत आंदोलक महिलेच्या कानाखाली मारणाऱ्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई; तातडीने ड्युटीवरून हटवलं

सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत अशी अण्णा हजारे यांची भूमिका आहे. लोकशाहीत संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याने अण्णा हजारे यांनी चिंता व्यक्त केली आहे. तब्ब्येत बरी नसल्याने अण्णा हजारे थोड्या वेळच या आंदोलनासाठी थांबणार आहेत. लोकशाहीत संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याने अण्णा हजारे यांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत अशी अण्णा हजारे यांनी भूमिका व्यक्त केली.

Anna Hajare: दिल्लीतील विद्यार्थ्यांची अवस्था पाहून अण्णा हजारे भावुक, पाठिंब्यांसाठी मौन आंदोलन केलं सुरू
VIDEO : अभिजीत दीपके आंदोलनावर ठाम; केंद्राचा प्रस्ताव CJP ने फेटाळला, प्रधानांच्या राजीनाम्याचा पुनरूच्चार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com