CJP Protest : दिल्लीत आंदोलक महिलेच्या कानाखाली मारणाऱ्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई; तातडीने ड्युटीवरून हटवलं

Delhi Jantar Mantar CJP Protest : जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान महिलेच्या कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांना ड्युटीवरून हटवण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांकडून स्पष्टीकरण मागवले.
DELHI POLICE OFFICER REMOVED AFTER VIRAL SLAP VIDEO DURING JANTAR MANTAR STUDENT PROTEST
DELHI POLICE OFFICER REMOVED AFTER VIRAL SLAP VIDEO DURING JANTAR MANTAR STUDENT PROTESTSaam tv
Published On
Summary
  • जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज

  • अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा महिलेच्या कानाखाली मारतानाचा व्हिडिओ व्हायरल

  • लांबा यांना ड्युटीवरून हटवण्यात आले

  • दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत पोलिसांकडून स्पष्टीकरण मागितले

मागील काही दिवसांपासून जंतर-मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी विध्यार्थी आंदोलन करत आहे. २२ जुलै रोजी या आंदोलनाने वेगळे वळण घेतले. या आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. या लाठी चार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला जोरात कानाखाली मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांना त्या ठिकाणच्या ड्युटीवरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठवण्यात आले आहे.

सोमवारी झालेल्या ‘संसद चलो’ मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज तसेच अश्रुधूराचा वापर केला होता. याच वेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये डीसीपी संदीप लांबा हे एका महिलेला जोरात कानाखाली मारली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधक आणि विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

DELHI POLICE OFFICER REMOVED AFTER VIRAL SLAP VIDEO DURING JANTAR MANTAR STUDENT PROTEST
Hair Care Tips : केसांचे गळणे होईल कायमचे बंद! मेथी दाण्यांमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून लावा; एका आठवड्यात दिसेल जादू

दरम्यान, बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला. वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायालयाचे लक्ष या घटनेकडे वेधले. व्हायरल व्हिडिओमध्ये एक वरिष्ठ पोलिस अधिकारी महिलेला जोरात कानाखाली मारताना दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याची मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली.

DELHI POLICE OFFICER REMOVED AFTER VIRAL SLAP VIDEO DURING JANTAR MANTAR STUDENT PROTEST
New Bride Ritual : आषाढ महिन्यात नवविवाहितेला माहेरी का पाठवतात? काय आहे परंपरा

या प्रकरणाची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. दुसरीकडे, संसद मार्चदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर RAF जवानांवर झालेल्या हल्ल्याचाही तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, टॉलस्टॉय मार्ग आणि संसद मार्ग चौकाजवळ काही आंदोलकांनी जवानांवर हल्ला केला. या घटनेत दोन्ही जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com