

अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांचं निलंबन मागे घेण्यात आलं.
चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा दाखवणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित
व्हिडिओनंतर प्रशासनाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा सोशल मीडियातून मांडणाऱ्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात आली आहे. चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा दाखवणारा त्यांनी एका व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यानंतर सेविकेला निंलबित करण्यात आलं होतं. निलंबनाच्या करवाईवरून प्रशासनावर टीका केली जात होती. त्यानंतर प्रशासनाने निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अंगणवाडीतील लहान मुलांना आणि गरोदर मातांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असल्याचा दावा करत सेविका देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईनंतर पोषण आहाराच्या दर्जाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. अखेर प्रशासनाने देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. त्यामुळे सेविकेला दिलासा मिळाला असून, आता पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रशासन पुढे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहाराचा पर्दाफाश करणाऱ्या देवयानी पारथे यांचे निलंबन अखेर प्रशासनाकडून मागे घेण्यात आले आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी होणाऱ्या हेळसांडीविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 'साम टीव्ही'ने ही बातमी लावून धरत सत्य समोर आणल्यानंतर प्रशासनाला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे.
निलंबन मागे घेतल्यानंतर, "नोकरी गेली तरी चालेल, पण मुलांच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही आणि भविष्यातही असा प्रकार घडल्यास पुन्हा आवाज उठवेन," असा ठाम निर्धार देवयानी पारधे यांनी व्यक्त केला आहे.
शालेय पोषण आहारामध्ये अंगणवाडीतील लहानशा लेकरांना देण्यात येणारा वाटाणा आणि भरडा शिजता शिजत नसल्याने पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी जळजळीत वास्तव समोर आणलं. भिजत घातलेला वाटाणा सुद्धा कुकरमध्ये 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा शिजत नसल्याने असला खाणा देणं बंद करा, अशी मागणी, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.