Yashomati Thakur Threat News: यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी, संभाजी भिडेंना अटक करण्याची केली होती मागणी

Sambhaji Bhide Statement: संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
Mla yashomati thakur, amravati, nafed
Mla yashomati thakur, amravati, nafedsaam tv
Published On

अमर घटारे, अमरावती

Amravati News: अमरावतीच्या (Amravati) तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ट्विटरवरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल अमरावतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले होते.

संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या मागणीनंतर त्यांना आता धमकी आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Mla yashomati thakur, amravati, nafed
Maharashtra Politics: आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार कमळाचा प्रचार करणार; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून धमकी आली आहे. 'दाभोळकर असाच ओरडत होता. एक दिवस जन्नतमध्ये पाठवला. टराटरा फाडून टाकला. हरामखोर कोण आहे बाई स्पष्ट करा.' अशा शब्दात हे ट्वीट करत त्यांना धमकी देण्यात आली आहे. कैलास सूर्यवंशी नावाच्या तरुणाने ट्विटरवरून ही धमकी दिली आहे. सध्या या धमकी प्रकरणी अमरावती पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Mla yashomati thakur, amravati, nafed
Mumbai Lakes Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 'इतका' टक्के पाणीसाठा; पाणीकपात केव्हा रद्द होणार?

संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करताना यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत हरामखोरे असं वक्तव्य केल्याचा संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानने आरोप केला होता. त्यावरून यशोमती ठाकूर यांना ट्विटरवरून धमकी आले असल्याचे सांगितले जात आहे. यशोमती ठाकूर यांना धमकीचे ट्वीट आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Mla yashomati thakur, amravati, nafed
Tamilnadu Accident News: कार आणि कंटेनरच्या धडकेत ४ जणांचा जागीच मृत्यू; तमिळनाडूमधील थरारक घटना

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी अल्टिमेट दिला होता. मात्र त्यांना अटक न केल्याने आज यशोमती ठाकूर पुन्हा आक्रमक होणार आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्ते घेऊन संभाजी भिडे यांच्याविरोधात ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com