Tamilnadu Accident News: कार आणि कंटेनरच्या धडकेत ४ जणांचा जागीच मृत्यू; तमिळनाडूमधील थरारक घटना

Accident News: अपघात इतका भीषण होता की, कारसह कंटेनरचा देखील यात चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Tamilnadu Accident News
Tamilnadu Accident NewsSaam tv
Published On

Tamilnadu News: तमिळनाडूमधून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. कार आणि कंटेनची जोरदार धडक झाल्याने अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तासंस्थेने अपघाताचे वृत्त दिले आहे. अपघाताची ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मदुराई या जिल्ह्यात अपघात झाला आहे. अपघातात कंटेनर कारवर पलटी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारसह कंटेनरचा देखील यात चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वाहन चालवताना वाहतूकीचे सर्व नियम पाळणे आवश्यक असते. एका शुल्लक चुकीमुळे देखील नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.

Tamilnadu Accident News
Jalna Crime News: डोक्यावर विग लावून करायचा चोऱ्या; अखेर 'मिस्टर नटवर लाल' असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

नाशिकमधून देखील अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. ट्रकच्या धडकेत एका होमगार्डचा मृत्यू झालाय. येवला-कोपरगाव रस्त्यावर दुचाकीवर जात असताना अपघाताची घटना घडली. होमगार्ड प्रदिप कृष्णा भावसार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. त्यांना ट्रकने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपस्थितांनी तातडीने त्यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी नेले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. येवला शहर पोलिसांनी ट्रक जप्त केला असून पोलिस अधिक तपास करत आहे. भावसार यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अवैधवाळूच्या डंपरने घेतला ३० वर्षीय तरुणाचा बळी

बीडच्या गेवराई शहरालगत समोरून येणाऱ्या दुचाकीला वाळू माफियाच्या डंपरने धडक दिल्याने, दुचाकीवरील ३० वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे. तर अपघातानंतर पळून जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. प्रल्हाद दशरथ नेमाने (वय ३० रा. धनगर गल्ली, गेवराई) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Tamilnadu Accident News
Delhi Crime News: दिल्ली पुन्हा हादरली! लग्नाला नकार दिल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, कॉलेजच्या बाहेर तरुणीसोबत केलं भयंकर कृत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com