Jalna Crime News: डोक्यावर विग लावून करायचा चोऱ्या; अखेर 'मिस्टर नटवर लाल' असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

डोक्यावर विग लावून चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत
Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam tv
Published On

Jalna Crime news: डोक्यावर टक्कल असताना चोरी करताना कुणालाही लक्षात येऊ नाही म्हणून डोक्यावर विग लावून चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. २५ वर्षीय मुस्तफा अब्दुल सय्यद उर्फ मिस्टर नटवर लाल असे पोलिसांनी अटक केलेल्या चोराचे नाव आहे. जालन्यातील अंबड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

अंबड शहरासह जिह्यात गेल्या दोन महिन्यापासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे या चोराला पकडण्याचं आवाहन पोलिसांसमोर होतं. गेल्या दोन महिन्यात या चोराने अंबड पोलीस स्टेशन हद्दीत उच्छाद मांडला होता. हा चोर कधी डोक्यावर विग लावून तर कधी विग न लावता चोरी करायचा. त्यामुळे तो सीसीटीव्हीत कैद होऊन त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर एक आव्हान ठरलं होतं.

Jalna Crime News
Ahmednagar Crime News : युवकांनी दुचाकीवरून येत बस थांबविली; बसमध्ये बसलेल्या दोन मुलींना केली मारहाण

अंबड शहराजवळ असलेल्या पाचोड महामार्गावरील पेट्रोल पंपावर एक अज्ञात व्यक्तीविना क्रमांकाची दुचाकी घेऊन विक्रीसाठी येत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत अंबड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दुचाकी घेऊन आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. त्यावेळी तो व्यक्ती वारंवार उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यावेळी या नटवरवर लालने दुचाकी घेऊन पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत चोराला पकडले.

या चोराने पोलिसांना अंबड शहरात बागडे ज्वेलर्स, आशीर्वाद मेडिकल, साई मेन्स कापड, पैठण येथूनएक दुचाकी ,एक स्कुटी आणि पाचोड येथून हार्डवेअर आणि ऑटो पार्टसच्या दुकानात चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरीसाठी अवलंबलेल्या पद्धती पाहून पोलीसही चक्रावून गेले.

Jalna Crime News
Mumbai Crime News: बनावट बँक हमीपत्र सादर करत मिळवलं कंत्राट; महापालिकेच्या आर उत्तर विभागातील खळबळजनक घटना

पोलिसांनी त्याच्या जालना शहरातील चंदनझिरा परिसरात असलेल्या घरातून मुद्देमालही जप्त केला आहे. मोठ्या प्रमाणात चोऱ्या करणाऱ्या चोराकडून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com