अमरावती शिक्षक मतदारसंघाचा पहिल्या फेरीचा निकाल जाहीर, काँग्रेस थेट चौथ्या क्रमांकावर; पाहा कुणाला किती मते मिळाली?

Amravati Teachers Constituency Result, Kiran Sarnaik, Aditi Pohare : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीचे किरण सरनाईक यांना ३,९०३ मते मिळाली असून ते १,६९४ मतांनी आघाडीवर आहेत.
Amravati Teachers Constituency Result, Kiran Sarnaik, Aditi Pohare
Amravati Teachers Constituency Result, Kiran Sarnaik, Aditi Pohare
Published On: 

Amravati teachers constituency first round election results : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसला मात्र या ठिकाणी जोरदार धक्का बसला असून थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी पहिल्या फेरीत १,६९४ मतांची मजबूत आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस उमेदवार आदिती पोहरे थेट चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. पहिल्या फेरीत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी दुसरे स्थान मिळवले आहे, तर अपक्ष उमेदवार सुरेश देवकर यांनी अनपेक्षित मुसंडी मारत तिसरे स्थान पटकावले आहे.

Amravati Teachers Constituency Result, Kiran Sarnaik, Aditi Pohare
मतमोजणीत हायव्होल्टेज ड्रामा! नागपुरात भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची टक्कर, तर अमरावतीत शिक्षकांचा संताप, पुण्यात काय स्थिती?

पहिल्या फेरीची अधिकृत आकडेवारी:

किरण सरनाईक (महायुती): ३,९०३ मते (आघाडीवर)

श्रीकांत देशपांडे (शिवसेना बंडखोर): २,२०९ मते

सुरेश देवकर (अपक्ष): १,५८२ मते

आदिती पोहरे (काँग्रेस): १,३१९ मते

दत्तात्रय लहाने (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे): १,१६९ मते

संगीता शिंदे (भाजप बंडखोर): ६९८ मते

शेखर भोयर (भाजप बंडखोर): ४३२ मते

Amravati Teachers Constituency Result, Kiran Sarnaik, Aditi Pohare
पुणे पदवीधरमध्ये पहिल्या पसंतीत हर्षदा देशमुख आघाडीवर, शिक्षक मतदारसंघात काय स्थिती? पाहा लेटेस्ट अपडेट

२९५ मते ठरली बाद

या मतमोजणीदरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पहिल्याच फेरीत तब्बल २९५ मते अवैध (बाद) ठरली आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीलाच किरण सरनाईक यांनी घेतलेली मोठी आघाडी पाहता महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील चुरस पाहता पुढील फेऱ्यांमध्ये काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com