पोलीस मुख्यालयातच बंदुकीने गोळी झाडून कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, अमरावतीत खळबळ

Police Suicide Amravati: अमरावतीत बंदुकीने गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने अमरावतीत खळबळ उडाली आहे.
Police Suicide Amravati
Police Suicide AmravatiSaam tv
Published On
Summary

अमरावती पोलीस मुख्यालयात घडली धक्कादायक घटना

अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

पोलिसाच्या आत्महत्येने दलात खळबळ

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावती पोलीस दलातून खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावती शहर पोलीस मुख्यालयात गुरुवारी सकाळी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलील कर्मचाऱ्याने पोलीस मुख्यालयात आयुष्य संपवलं. पोलीस कर्मचार्‍याच्या निर्णयाने सहकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या शीघ्र कृती दलाच्या पथकातील जवानाने गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. विजय नागपूरे असे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कार्यालयातून गोळीबाराचा आवाज होताच इतर कर्मचारी धावून गेले. परंतु तोपर्यंत या जवानाचा जीव गेला होता.

Police Suicide Amravati
Ashok Kharat case : भोंदू अशोक खरात सारख्यांना मारून टाकावं आणि विषय संपवावा - संभाजी भिडे

शेअर बाजारात झालेल्या नुकसानाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. परंतु अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी कर्मचार्‍याच्या आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

स्वत:वर गोळ्या झाडल्यानंतर जखमी कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात केलं होतं. परंतु डॉक्टरांनी प्राथमिक तपासानंतर पोलीस कर्मचाऱ्याला मृत घोषित केले. पोलीस कर्मचारी विजय नागपूरे यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे .

Police Suicide Amravati
भोंदूबाबाच्या विकृतीचा पॅटर्न, कवडीमोल चिंचोके, लाखोंना विकले, नकली साप आणि वाघानं गंडवलं

रामराव होळकर यांची आत्महत्या

तत्पूर्वी, मुंबई येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी उपोषणाला बसलेले दीपक बोऱ्हाडे यांचे सासरे रामराव होळकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी दीपक बोऱ्हाडे यांच्या घरीच गळफास लाऊन आत्महत्या केलीय. दीपक बोऱ्हाडे गेली दहा दिवस मुंबईमध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com