

अमर घटारे, प्रतिनिधी...
Amravati News: फिलिपाइन्समध्ये एक लहान विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात अमरावतीच्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. अंशुम कोडे असे या तरुणाचे नाव असून तो चार महिन्यांपूर्वी वैमानिक बनण्याचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी फिलिफाईन्स देशात गेला होता. या दुर्देवी घटनेने अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी १२:१६ च्या सुमारास इको एअर सेसना १५२ या विमानाने लाओग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. यानंतर त्याचा संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झाले.
दुपारी ३:१६ च्या सुमारास तुगेगराव विमानतळावर हे विमान पोहोचणार होते. मात्र, शोध पथकाला काल दुपारी अपायाओ प्रांतात या विमानाचे अवशेष सापडले. या दुर्देवी घटनेत अंशुम (Anshum Kode) कोडे याच्यासह आणखी एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अंशुम कोडेचे पार्थिव एअर ॲम्बुलन्सने भारतात आणण्यात येणार आहे. वैमानिक बनण्याचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी अंशुम कोंडे फिलीपिन्स देशात गेला होता. परंतु या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने अमरावती (Amravati) जिह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.