Maharashtra Rain Update News: ठाणे, पालघर, पुणे आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज; पुढील 4 दिवस कशी असेल पावसाची स्थिती; जाणून घ्या...

Rain Alert in Maharashtra : ठाणे, पालघर, पुणे आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज; पुढील 4 दिवस कशी असेल पावसाची स्थिती; जाणून घ्या...
Maharashtra Rain Update News
Maharashtra Rain Update NewsSaam Tv
Published On

Maharashtra Rain Update News: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, पुणे आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांसाठी 4 ऑगस्टसाठी (शुक्रवार) यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने नुकतेच एक प्रेस रीलिझ जारी करून महाराष्ट्रात पुढील चार दिवसांच्या पावसाच्या अंदाजाची माहिती दिली आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत पावसाची तीव्रता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

Maharashtra Rain Update News
Delhi Services Bill: दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, India आघाडीचा वॉकआउट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यलो अलर्टने चिन्हांकित क्षेत्रांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची आहे. 3 ऑगस्टच्या अंदाजानुसार कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस, उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम पाऊस आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला.  (Latest Marathi News)

शुक्रवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी कोकण-गोव्यातील बहुतांश जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. हवामान विभागाने मुंबईसाठी ग्रीन अलर्ट जारी केला आहे. जे दर्शविते की शहरात 4 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता कमी आहे.

Maharashtra Rain Update News
Solapur News: सोलापुरात प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या

तसेच 5 ऑगस्ट रोजी उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर दक्षिण कोकण-गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय 6 आणि 7 ऑगस्ट रोजी कोकण-गोव्यात विविध ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com