अमर घटारे
अमरावती : भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्या जवळील १ लाख ६७ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना अमरावतीजवळ असलेल्या बडनेरा येथील मोमीनपुऱ्यात घडली असून आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे, बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
उमेश सुरेश राठोड हे भारत फायनान्स कंपनीमध्ये वसुलीचे काम करतात आणि बचतगटाच्या महिलांना फायनान्स करतात. (Amravati) दरम्यान उमेश राठोड हे वसुलीसाठी गेले असता १ लाख ६७ हजार रूपये जमा करून ते बडनेरा येथील मोमीनपुऱ्यात एका महिलेच्या घरी बचत गटाच्या महिलांची मिटींग घेण्याकरिता गेले होते. महिलेच्या घरात बसले असता अचानक एक युवक चेहऱ्याला दुपट्टा बांधून आला आणि उमेशच्या डोळ्यात मिरची पावडर फेकले आणि त्याच्या जवळील १ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम हिसकावून पसार झाला.
सीसीटीव्हीत चोरटा कैद
सदर घटनेनंतर उमेश राठोड यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केली. मात्र सदर लुटारु तरुण हा तेथून पसार झाला. घडल्या घटनेची माहिती (Badnera) बडनेरा पोलिसांना मिळताच त्यांनी तपास सुरू केला असून परिसरातील एका सीसीटीव्ही केमेरात हा चोरटा दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.