Amravati Crime : हत्येच्या घटनांनी अमरावती हादरलं, गेल्या 24 तासांत चौघांचा खून; नागरिकांमध्ये घबराट

Amravati Latest Crime News : हत्येच्या घटनांनी अमरावती हादरलं असून गेल्या 24 तासांत 4 जणांचा भररस्त्यात खून करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Amravati Latest Crime News
Amravati Latest Crime NewsSaam TV
Published On

अमर घटारे, साम टीव्ही

राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु असताना हत्येच्या घटनांनी अमरावती हादरलं आहे. गेल्या 24 तासांत शहरात 4 जणांचा खून झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. भरदिवसा या घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. आरोपींवर पोलिसांचा वचक आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. आरोपींचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Amravati Latest Crime News
Ahmednagar Crime : खळबळजनक! दीराने 2 भावजयांना कोयत्याने सपासप वार करत संपवलं; दुहेरी हत्याकांडाने अकोले हादरलं

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येची पहिली घटना महाजनपुरा परिसरात घडली आहे. येथील रहिवासी प्रेमराज ऊर्फ मोंटू गोळे आणि अजय वानखेडे हे दोघे मित्र दुचाकीने जयस्तंभ चौकातून जात होते. त्यावेळी 4 ते 5 जणांनी मोंटू गोळे याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मोंटू गंभीर जखमी झाला.

नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या हत्याकांडाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हल्ला करणारे आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मोंटू याची हत्या करताना अजय याने आरोपींना पाहिले होते.

तो या हत्या प्रकरणातील एकमेव साक्षीदार होता. अजयचा देखील आरोपींनी भररस्त्यात चाकूने भोसकून खून केला आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अजय वानखेडे याची देखील हत्या करण्यात आल्याने महाजनपुरा परिसरातील तरुणांचा जमाव सोमवारी रात्री पोलीस आयुक्तालयासमोर एकत्रित आला होता.

यावेळी आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली. पोलीस आणि जमावामध्ये बाचाबाची झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष बाब म्हणजे, दोघांची हत्या झाल्यानंतरही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती आहे. हत्येची तिसरी घटना शहरातील मसानगंज परिसरात घडली आहे.

किरकोळ वादातून वैभव पटेरिया या युवकावर 4 ते 5 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वैभवचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एका घटनेत बडनेरा येथे मजहर नावाच्या युवकावर त्याच्या 2 मित्रांनी हल्ला केला. यामध्ये मजहरचा देखील मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली तर काही आरोपी फरार आहेत.

Amravati Latest Crime News
Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com