Shocking : सरकारी कंत्राटदाराने आयुष्य संपवलं, चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण; अमरावतीत खळबळ

Amravati Government Worker Sucide News : अमरावती जिल्ह्यात शासकीय कंत्राटदार सुनील वागद्रे यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. शासकीय कामांचे अडीच कोटी रुपये थकबाकी असल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज
Amravati Sunil Wagdre News
Amravati Sunil Wagdre NewsSaam tv
Published On: 
Summary
  • अमरावतीतील शासकीय कंत्राटदार सुनील वागद्रे यांची आत्महत्या

  • त्यांच्या शासकीय कामांची जवळपास अडीच कोटी रुपये बिले थकीत असल्याची माहिती

  • कुटुंबीयांच्या माहितीनुसार, स्वतःची गुंतवणूक आणि रखडलेल्या बिलांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील जरूड येथील शासकीय कंत्राटदार सुनील वागद्रे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वागद्रे यांच्या कामांची जवळपास अडीच कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून वागद्रे यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे.

मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी समोर

सुनील वागद्रे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी समोर आली आहे. या चिठ्ठीत त्यांनी कुटुंबीयांना उद्देशून काही महत्त्वाच्या सूचना लिहिल्याचे समोर आले आहे. लहान भाऊ-बहिणींचे शिक्षण पूर्ण करण्याची आणि कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी मोठ्या भावाने सांभाळावी, असे त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, उरलेल्या बिलांची वसुली करणे, देणी चुकती करणे आणि कर्जफेडीसाठी बाग विकण्याबाबतही त्यांनी चिठ्ठीत लिहले आहे. आपल्या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिल्याचे सांगण्यात येत आहे.

Amravati Sunil Wagdre News
Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

कर्जबाजारीपणामुळे आर्थिक संकट

वागद्रे यांनी शासकीय कामांसाठी स्वतःचे पैसे गुंतवले होते. यासाठी सोने आणि शेती गहाण ठेवल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कामांची बिले बाकी असल्याने आणि ती रक्कम परत न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देता येत नसल्याची खंतही त्यांना होती, असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

Amravati Sunil Wagdre News
Tea Tips : चहा रोज प्यायला आवडत असेल तर, 'या' ६ चुका अजिबात करू नका; नाहीतर वाढेल कॅन्सरचा धोका

कंत्राटदार संघटनेचा शासनावर आरोप

या घटनेच्या निषेधार्थ अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शासकीय कंत्राटदार संघटनेने बॅनर लावून शासनाच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. ‘ही आत्महत्या नसून शासनाने घेतलेला बळी आहे,’ अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर लावण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात शासकीय देयके न मिळाल्यामुळे आतापर्यंत नऊ कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. संबंधित मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत ज्या कर्मचाऱ्यांचे पैसे अद्याप दिलेले नाही ते तातडीने देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com