अमरावती : यंदाची निवडणुक काही लाेकांनी खालच्या दर्जास नेली याची खंत वाटते. खालच्या दर्जाचा प्रचार व प्रसार केला. हे चुकीचे आहे असे मत सहकार पॅनलच्या प्रमुख संघटक यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. त्यांनी अमरावती बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. amravati-district-cooperative-bank-election-voting-yashomati-thakur-bacchu-kadu-sml80
आज (साेमवार) अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे विशेषतः राजकारणातील दिग्गजांचे लक्ष लागले आहे. ही निवडणुक महाविकास आघाडीमधील महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात हाेत आहे.
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सहकार पॅनल निवडणुकीत विजयी होईल असा दावा केला. त्या म्हणाल्या ही निवडणुक महाविकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी हाेती. या निवडणुकीत काेणी काेणाचा दुश्मन नसताे. प्रत्येकाला आपले मत द्यायचा अधिकार आहे. प्रत्येकाने शेतक-यांच्या हितासाठी मतदान केले पाहिजे असं माझे मत आहे.
यंदाची निवडणुक काही लाेकांनी खालच्या दर्जास नेली याची खंत वाटते. खालच्या दर्जाचा प्रचार व प्रसार केला. हे चुकीचे आहे. ही बॅंक शेतक-यांची आहे. त्यांच्या हिताची बाजू आपण पाहिली पाहिजे. विदर्भातील सहकार क्षेत्रात काही फलित आले आहे अशातला काही भाग नाही. २ बॅंकापैकी आपली अमरावतीची बॅंक सुरळीत सुरु आहे असे ठाकूर यांनी व्यक्त केले.
दरम्यान जिल्हा बँक निवडणूक काँग्रेसची सलग दहा वर्ष सत्ता होती. ही सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके, राज्यमंत्री बच्चू कडुसह इतर नेते एकत्र आले आहेत. यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.