Ajit Pawar
Ajit Pawar

पुणे, नाशिकच्या सुरक्षिततेसाठी लाॅकडाउनचा निर्णय : अजित पवार

Published on

सातारा : पारनेर आणि संगमनेर तालुक्यात काेविड १९ रुग्ण संख्या वाढल्याने नगर जिल्ह्यातील ६१ गावांवर निर्बंध लावले आहेत. पुणे आणि नाशिक जिल्ह्याला फटका बसू नये यासाठी आत्ताच नगर जिल्ह्यातील दाेन तालुक्यातील रुग्ण संख्या राेखण्यासाठी निर्णय घेतला गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ajit-pawar-addressed-media-raju-shetti-covid19-nagar-lockdown-satara-marathi-news-sml80

उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar हे रविवारपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज (साेमवार) उपमुख्यमंत्र्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Ajit Pawar
टोल मागितल्याने पोलिसाचा राडा; कर्मचाऱ्यास चाेपले, गुन्हा दाखल

आजपासून राज्यात शाळा सुरू होत आहेत. परंतु अद्याप १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण झालेले नाही याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले १२ ते १८ वर्षाच्या मुलांचे लसीकरण करावे अशी चर्चा आहे. अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू केले जाईल. परंतु मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असून अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही असेही पवार यांनी नमूद केले.

ऊसाच्या एफआरीपी FRP बाबत राजू शेट्टी यांनी दिलेल्या इशाऱ्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले गत वर्षीची रिकव्हरी पाहून हा निर्णय घेतला जातो.राजू शेट्टी त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत आहेत, त्या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल.

नगर जिल्ह्यातील ६१ गावांत लॉकडाउन nagar lockdown करण्यात आला आहे. या विषयी उपमुख्यमंत्री पवार यांनी पारनेर आणि संगमनेर तालुक्यात काेविड १९ रुग्ण संख्या वाढल्याने निर्णय घेतला गेल्याचे सांगितले. पुणे आणि नाशिक जिल्हा या दोन तालुक्यांना लागून आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या रोखली पाहिजे अन्यथा याचा फटका पुणे आणि नाशिकला बसू शकतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com