आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना फूड पॉइझनिंग; जेवणानंतर मुलांना होऊ लागल्या उलट्या

Ashram School Food Poisoning : अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका आश्रमशाळेतील सुमारे ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
Ashram School Food Poisoning
40 students hospitalized due to food poisoning in Melghat Ashram Schoolsaam tv
Published On
Summary
  • मेळघाट आश्रमशाळेत ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

  • धारणी येथील आश्रमशाळेतील फूड पॉइझनिंग प्रकरण

  • जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ

अमर घटारे, साम प्रतिनिधी

मेळघाटातील टीटंबा आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडलीय. अमरावती जिल्ह्यातील धारणी गावात ही आश्रमशाळा आहे. येथील विद्यार्थ्यांना फूड पॉइझनिंग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत सुमारे ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Ashram School Food Poisoning
डोक्याला सतत खाज का सुटते? टाळूची खाज कशी घालवायची?

नेहमीप्रमाणे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी संध्याकाळचे जेवण केलं. मात्र या जेवणानंतर मुलांना उलटी व मळमळीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तेथील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून, रुग्णालयाबाहेर पालकांची मोठी गर्दी झाली आहे. या घटनेमुळे आश्रमशाळा परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांना नेमकी कोणत्या अन्नपदार्थामुळे त्रास झाला, याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

Ashram School Food Poisoning
Fenugreek Seeds: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीदाणे खा; ५ समस्यांपासून मिळेल आराम

विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास होऊ लागल्याचं माहिती होताच शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी ऑटो, कार, जीप, काळी-पिवळी अशा मिळेल त्या वाहनांतून विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहोचवले. घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित राजकुमार पटेल रुग्णालयात दाखल झालेत.

ठाणेदार अवतार सिंग चव्हाण व पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. शासकीय डॉक्टरांवर उपचाराचा ताण वाढल्याने खाजगी डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना उचलून वॉर्डपर्यंत पोहोचवत उपचारासाठी मोलाची मदत केली.विद्यार्थ्यांवर युद्धपातळीवर उपचार सुरू असून सर्वांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाचे लक्ष. विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com