Maharashtra politics : रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी लंच डिप्लोमसी? तटकरेंच्या स्नेहभोजनाकडे गोगावलेंची पाठ | VIDEO

Sunil Tatkare lunch diplomacy : अमित शाहांच्या रायगड दौऱ्यात चर्चा रंगली ती पालमंत्रिपदाची. शाहांसाठी तटकरेंनी मेजवानी ठेवली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली? आणि पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलाय का?
Raigad guardian minister
Raigad guardian minister
Published On

Raigad guardian minister : महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे... त्यामुळेच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. तब्बल 4 महिन्यानंतर आता पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची आशा निर्माण झालीय. त्याला कारण ठरलंय सुनील तटकरेंची लंच डिप्लोमसी. रायगड दौऱ्यानंतर अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी हजेरी लावली. मात्र ही कौटूंबिक भेट असल्याचं तटकरेंनी म्हटलंय..

सरकारने जाहीर केलेल्या यादीत रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरेंना तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांना देण्यात आलं होतं. मात्र त्यावर शिंदे गटाने आक्षेप घेतल्यानंतर अवघ्या 24 तासात रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर शिंदे गट विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली होती.. एवढंच नाही तर अमित शाहांच्या दौऱ्यापुर्वी शिंदे गटाने उठाव करण्याची भाषा केली....

Raigad guardian minister
Maharashtra Politics : भाजप खासदार उदयनराजे भोसलेंच्या 6 मागण्या; अमित शहांचं मौन, रायगडावर नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

असं असलं तरी रायगडच्या कार्यक्रमानंतर अमित शाहांनी तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला जाणं पसंत केलं... स्नेहभोजन करता करता अमित शाहांनी पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवला अशी चर्चा आता रंगलीय.. आता ही शाहांचा कौल तटकरेंच्या बाजूने असणार की भरत गोगावलेंच्या? हे पाहण महत्वाचं

Raigad guardian minister
Maharashtra Politics: साताऱ्यातील बैठकीत दोन्ही पवार एकत्र; काका -पुतण्या मांडीला मांडी लावून बसले|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com